सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

प्रसिद्ध ज्योतिष्य आचार्य सुनील शास्त्री यांचे परतुरात प्रथमच गुरुदरबाराचे आयोजन ,नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा - मोहन अग्रवाल



 परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
 परतुर शहरात प्रथमच प्रसिद्ध ज्योतिष्य आचार्य सुनील शास्त्री यांचे गुरुदरबाराचे आयोजन २ फेब्रुवारी २०२५ रविवार रोजी दुपारी ४ : ०० वाजता गजानन लॉन्स साईबाबा मंदिर जवळ परतुर येथे करण्यात आले आहे. 
आचार्य सुनील कुमारजी हे गेली २२ वर्ष भाग्य परिवर्तनाच्या माध्यमातून घरातील प्रत्येक अडचणींवर योग्य आणि फलदायी मार्ग दाखवत असलेल्या संपूर्ण महाराष्ट्रासह अमेरिका कॅलिफोर्निया, दुबई पासून देशात दिल्ली, गुडगाव, हैदराबाद, गोवा, इंदोर, आणि महाराष्ट्रात छत्रपती संभाजी नगर, पुणे, नाशिक व मुंबई येथे त्यांचे सेंटर्स आहेत तरी सर्व नागरिकांनी या कार्यक्रमास परिवारसह उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कार्यक्रमाचे आयोजक मोहन अग्रवाल यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत