सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

वाई येथे अखंड हरिनाम सप्ताह संगीत रामायण कथा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तसेच श्री रामदूत बजरंग बली प्राणप्रतिष्ठा व कळशारोहन सोहळा.


प्रतिनिधी रामेश्वर उबाळे 
मंठा तालुक्यातील वाई येथे अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मित्ती मा 6 सहा दिनांक 3/2/2025 वार सोमवार हरिभक्त परायण गुरुवर्य भगवान बाबा आनंदगडकर यांच्या आशीर्वादाने दैनंदिन कार्यक्रम*पहाटे 4 ते 6 काकडा, भजन*6*7विष्णुसहस्त्रनाम*7 ते 9 ज्ञानेश्वरी पारायण*9 ते 11 गाथा भजन*1 ते 4 राम कथा*सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ व रात्री 8 ते 10 हरिकीर्तन व नंतर हरी जागर होईल.
   शिवचरित्रकार श्री हरिभक्त परायण
1) बाळासाहेब महाराज शिंदे फेमस आळंदी देवाची यांचं सोमवार दिनांक 3/2/ 2025 रोजी पहिले कीर्तन होणार आहे तरी परीसरातील भाविक भक्ताने या कीर्तनाचा आनंद घ्यावा अशी वाईगावातील सर्व नागरिकांची इच्छा आहे.
2) हरिभक्त डॉक्टर अरुण वाळके संतपिट श्री क्षेत्र पैठण यांचे कीर्तन होणार आहेत.
3) हरिभक्त श्री प्राध्यापक उद्धव महाराज राऊतआकनिकर एम ए संगीत यांचे कीर्तन होणार आहेत
4) हरिभक्त म माळोदे आष्टी. 
5) हरिभक्त नारायण म पिंपळे गुरुजी. 
6) हरिभक्त नंदू जाधव खडका. 
7) हरिभक्त सागर म.दिंडे नाशिक 
8) हरिभक्त अर्जुन म मोठे महाराज पळशीकर यांचे अमृततुल्य वाणीतून दहा ते बारा वाजताकाल्याचे कीर्तन होईल व नंतर महाप्रसाद होईल. 
  तसेच सर्व पंचकुशीतील भाविक भक्तांनी वरील कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा अशी वाई येथील गावकऱ्यांच्या वतीने इच्छा आहे तसेच बजरंग बली हनुमान यांच्या कलाशारोपण कार्यक्रमाची मोठी भव्य दिव्य अशी मिरवणूक काढून श्री बजरंग बली हनुमान यांची प्राणप्रतिष्ठा आपल्या सर्वांच्या वतीने व आपल्या सर्वांच्या शाक्षेने स्थलांतरित करण्यात येणार आहे तरी परिसर सरातील सर्व भाविक भक्तांनी आपण प्रत्यक्ष हजर राहून याचा आनंद घ्यावा व आशीर्वाद घ्यावा.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत