सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

महाबोधी बुद्ध विहार बिहार येथे बौद्ध भिक्षूंकाच्या उपोषणास बसलेले बौद्ध भिक्षू भिक्षुनी यांच्या आंदोलनास जालना येथे पाठिंबा जाहीर

जालना प्रतीनीधी समाधान खरात
बौद्ध समाज सेवा संघ जालना सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जालना महाराष्ट्राच्या वतीने महाबोधी बुद्ध विहार बिहार येथे बौद्ध भिक्षूंचे गत पंधरा दिवसापासून उपोषणास बसलेले बौद्ध भिक्षू भिक्षुनी यांच्या आंदोलनास पाठिंबा जाहीर करून माननीय नरेंद्रजी मोदी यांना जिल्हाधिकारी जालना श्रीकृष्ण पांचाळ द्वारा निवेदन देण्यात आले. यावेळी बौद्ध समाज सेवा संघाचे प्रभाकरराव घेवंदे अण्णासाहेब चितेकर सतीश वाहुळे डॉक्टर शिवाजीराव लहाने एडवोकेट राजेंद्र पारखे सुरेश उघडे रिंकल तायड मंदा ठोकळ छाया बोर्डे मनकर्णाबाई डांगे बाला सरकटे अविनाश साळवे तुषार साळवे सुमेध घेवंदे अजिंक्य घेवंदे विजयकुमार साळवे सुनील नावकर आदी समाज बांधव आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत