सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

वंचित बहुजन महिला आघाडी च्या वतीने पं.स.परतूर येथे अनुपस्थित कर्मच्याऱ्यांच्या खुर्ची ला हार घालून गांधीगिरी आंदोलन.

परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण
 दिनांक १० मार्च रोजी वंचित बहुजन आघाडी महिला आघाडी चे वतीने परतूर पंचायत समिती मध्ये शिष्टमंडळ विविध प्रश्न उपस्थित करण्याकरिता बहुसंख्येने पोहोचले .परतूर पंचायत समिती मधे सध्या प्रचंड गोंधळ अनागोंदी चालू आहे सर्वसामान्य घरकूल लाभार्थी बिला साठी पैसे दिल्याशिवाय बिले दिले   जात नाहीत शेतकऱ्यांचे विहिरीचे बिल काढायला लाभर्थी पैसे दिल्याशिवाय बिले अदा केले जात नाहीत ग्रामपंच्यायातीत प्रचंड भ्रष्टाचार चालू आहे सत्ताधारी ग्रामपंचायती मध्ये विरोधकांना त्रास दिला जात आहे विकास कामात प्रचंड भ्रष्टाचार होत आहे शासनाने ५ दिवसाचा आठवडा केला त्या
अनुसंह्यंगाने अधिकारी सकाळी ९:४५ ते ६:१५ पर्यंत कार्यालयात उपस्थित असणे बंधनकारक  आहे असे असताना पंचायत समितीत अधिकारी कर्मचारी सतत गैरहजर असतात सोमवारी कार्यालयात उपस्थित असणे गरजेचे असताना देखील आज गटविकास अधिकारी यांच्या सह अनेक अधिकारी कर्मचारी गैरहजर होते त्यामुळे गटविकास अधिकारी यानच्या खुर्चीला निवेदन आणि हार घालून गांधीगिरी करून निषेधात्मक आंदोलन करण्यात आले परतूर पंचायत समिती मध्ये सर्व सावळा गोंधळ सुरू आहे याचा वंचित बहुजन आघाडी ने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला असूून कारभार सुधारा नसता वंचित बहुजन आघाडी ही वंचित स्टाईलने आंदोलन छेडले 
   यावेळी मा नगराध्यक्ष मंगलताई पाणवले येणूताई लांडगे सुमनताई गरड मीराताई पहाडे उषाताई पहाडे वर्षा सोनपसारे रामप्रसाद थोरात  पडघाणे ताई रवींद्र भदर्गे दिपक वक्ते राहुल नाटकर महादेव पैठणे स्वप्नील पहाडे प्रशांत वाकळे गौतम मुंढे बाळाभाऊ भालेकर भगवान वाडमारे विठ्ठल तरसे भगवान वाघमारे गौतम गरड अश्योक वाघमारे रामचंद्र पाणवले चोखा  सौंदर्य जमीर  मिलिंद मगर अर्जुन शेजुळ सुरेश लहाडे सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत