सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

राहुल लोणीकर यांना विधान परिषदेवर संधी द्यावी-नितीन सरकटे पाटील


तळणी प्रतिनिधी  रवी पाटील 
  महाराष्ट्र भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद सक्षम पणे सांभाळत युवा मोर्चाच्या माध्यमातून तरुणांना राजकारणात उभारी घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे युवानेते  राहुल लोणीकर यांच्याकडे पाहिले जाते. परतूर मंठा मतदार संघातील लोकांच्या सुखा दुखात सदैव सहभागी असणारे श्री. राहुल लोणीकर सारख्या युवा नेतृत्वाला विधान परिषदेवर संधी द्यावी अशी माघणी भाजपा युवा मोर्च्या जिल्हाउपाध्यक्ष नितीन सरकटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.राहुल लोणीकर यांनी ६११ जोडप्यांचे सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा परतूरमध्ये मोठ्या थाटात संपन्न केला होता. कोविड काळात त्यांनी गोरगरिबाच्यासेवेत होते. मतदार संघातील गोरगरीब लोक पोट भरण्यासाठी संभाजीनगर, पुणे, मुंबई या ठिकाणी असताना देखील 'त्या ठिकाणी त्यांना कोविड काळामध्ये धान्याची आवश्यकता असताना मदत करून हॉस्पिटल मध्ये देखील मदत केली. कोविड काळात होणारा रक्ताचा तुटवडा पाहून मराठवाड्यात विक्रमी रक्तदान करून घेणारा युवा नेता शेतकऱ्याचे प्रश्न असो पाण्याचा प्रश्न विद्यार्थ्यांचे प्रश्न असो किंवा आणखीन कुठले प्रश्न असो प्रत्येक गोष्टीमध्ये ते अग्रेसर असतात म्हणून असे सामान्यतील असामान्य नेतृत्वाला विधान परिषद वर घेऊन पक्षश्रेष्ठींनी मराठवाड्याला न्याय द्यावा अशी मागणी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री नितीन सरकटे यांनी केली आहे..

मतदार संघातील युवा कार्यकर्त्याची  मोठी फळी राहुल लोणीकंरा सोबत असून युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष्य पदाच्या कार्यकाळात पक्ष्याच्या प्रवाहात युवा कार्यकर्त्यांना जोडण्याचे मोठे काम सघटनेच्या माध्यमातून केले आहे यामुळे त्यांना विधान परिषेदेवर घेऊन युवकांचे प्रश्न मार्ग्री लागतील असा आशावाद नितीन सरकटे यांनी व्यंक्त केला

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत