सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या अध्यक्षपदी अशोक ठोके तर सचिव पदी रवी इंगळे यांची निवड...



परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
 प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी भारतरत्न, बोधिसत्व
परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती परतूर रेल्वे स्टेशन येथे साजरी करण्यात येणार आहे, महामानवाची जयंती थाटामाटात 
साजरी करण्याच्या अनुषंगाने परतूर रेल्वे स्टेशन
येथे आर.सी. सी. मित्र मंडळ व पंचशील मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्याच्याअनुषंगाने दिनांक 1 एप्रिल 2025, वार मंगळवार रोजी जयंती कार्यकारीनी निवडीची बैठक पार पडली.
   या बैठकीत दैनिक युवक आधार चे जालना जिल्हा प्रतिनिधी अशोक ठोके यांची अध्यक्षपदी तर सचिव पदी रवी इंगळे व उपाध्यक्षपदी वंचित बहुजन आघाडीचे परतूर शहर अध्यक्ष राहुल नाटकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.त्यांच्या निवडीने परिसरातील आंबेडकरी अनुयायांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.या जयंती उत्सव समितीची पुढीलप्रमाणे कार्यकारिणी निवडण्यात आली आहे.
अध्यक्ष:- आयु. अशोक ठोके 
उपाध्यक्ष : आयु.राहुल नाटकर
सचिव :- आयु. रवि इंगळे 
कोषाध्यक्ष :आयु.दिपक हिवाळे 
सहसचिव :- आयु.प्रदीप साळवे
संघटक:आयु. स्वप्नील पहाडे
सहकोषाध्यक्ष :आयु केतन खंदारे.
             डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीची बैठक यशस्वी पार पडावी म्हणून विकास वेडेकर, नितीन खरात व रमेश कदम यांनी देखील मोलाचे सहकार्य केले.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत