सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

पोलीस ठाण्याच्या आवारातच पोलीसांची पत्रकाराला धमकी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार; पत्रकार संरक्षण कायद्याबाबत ठाण्याचे पोलीस अधिकारी अनभिज्ञ!


जालना  प्रतिनिधी - समाधान खरात/नरेश अन्ना
  पोलीस ठाण्याच्या आवारातच एका पत्रकाराला बुधवार (दि 2) रोजी सुनील भारती, विलास गायकवाड, गणेश सातपुते तिघे पत्रकार उभ्या असताना त्यांच्या समोर धमकी दिल्याची तक्रार तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे संबंधीत पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांनाच पत्रकार संरक्षण कायद्याबाबत माहिती नसल्याचे दिसून आले असून याबाबत वरिष्ठांना तक्रार पाठवून त्यांच्याकडून याबाबत पत्रकार संरक्षण कायद्याबाबत माहिती घेऊन गुन्हा दाखल करण्यात येईल असे आश्‍वासन ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री उनवणे यांनी पत्रकारांच्या शिष्टमंडळाला दिले आहे.
या संदर्भात दिलेल्या तक्रारीत जलजला टाईमचे संपादक आमेर खान याकुब खान याने म्हटले आहे की, त्यांच्या वृत्तपत्रात दि 31 मार्च 2025 रोजी बातमी लावल्याचा राग मनात धरून पोलीस कर्मचारी चंद्रकांत माळी यांनी जालना तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात सुनील भारती, विलास गायकवाड, गणेश सातपुते त्यांना समोर बुधवार (दि 2) रोजी धमकी देत चेतावले आहे. श्री माळी म्हणाले की, खेटायचे असेल तर मी पूर्णपणे आता खेटतोच व तुला बघुन घेतो असे म्हणून त्यांनी आमेर खान याचे फोटो काढले. चंद्रकांंत माळी यांचे वाळुमाफीयांशी हितसंबंध आहे. त्यामुळे श्री माळी यांच्याकडून व त्यांच्या हितचिंतकांकडून आमेर खान यांच्या जीवितास धोका निर्माण झालेला असल्याचे तक्रारीत नमूद असून पोलीस अधिकार्‍यांनी वेळीच या बाबीकडे गांभीर्याने लक्ष घालून पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत योग्य ती कारवाई करण्यात यावी.
यासंदर्भात पोलीस निरीक्षक श्री उनवणे यांना पत्रकारांचे शिष्टमंडळ भेटले. त्यांनी विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने चंद्रकांत माळी यांना बोलावून घेऊन नेमके प्रकरण काय ते त्यांच्याकडून जाणून घेतले. पत्रकारांच्या शिष्टमंडळासमोर श्री माळी यांनी घटनाक्रम सांगत एक प्रकारे धमकी दिल्याची कबुलीच दिली. त्यामुळे पोलीस निरीक्षक श्री उनवणे यांनी तक्रार दाखल करण्यास सांगितले. तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियेदरम्यान पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांना पत्रकार संरक्षण कायद्याची माहितीच नसल्याने त्यांनी पोलीस निरीक्षकांना याबाबत विचारले असता त्यांना देखील याबाबत विचारले असता ते देखील अनिभिज्ञ असल्याने त्यांनी तक्रार द्या, वरिष्ठांना तक्रार पाठवून त्यांच्याकडून कोणता गुन्हा दाखल करायचा याबाबत जाणून घेऊन येत्या दोन दिवसात गुन्हा दाखल करण्याचे आश्‍वासन दिले.
पोलीसांनी आश्‍वासन दिले असले तरी या बाबीचे गांभीर्य पोलीसांनी लक्षात घेऊन लवकरात लवकर निर्णय घेऊन गुन्हा दाखल करावा अन्यथा पत्रकारांच्यावतीने लोकशाही मार्गाने आंदोलनाचा ईशाराही पत्रकारांच्या वेगवेगळ्या संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.



Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत