सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

प्रा. गणेश चंद्रकांत गाडेकर (सिंहगड कॉलेज पुणे) यांना संगणकीय उपायोजन (कॉम्प्युटर अप्लिकेशन) या विषयामध्ये पी. एच. डी पदवी प्रदान..

परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण
सिंहगड कॉलेज पुणे येथे कार्यरत असलेले प्रा. गणेश चंद्रकांत गाडेकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथून संगणकीय उपायोजन (कॉम्प्युटर अप्लिकेशन) मध्ये "पुणे शहरातील व्यवस्थापन महाविद्यालयांच्या विशेष संदर्भात उच्च शिक्षणातील शिक्षण व्यवस्थापन प्रणालीचा अभ्यास" या विषयावर विद्यावाचस्पती (पी.एच.डी) पदवी प्रदान करण्यात आली.
सदर संशोधन अभ्यासक्रमात त्यांना डॉ. यशवंत वायकर सर सहाय्यक प्राध्यापक - एमसीए
व्यवस्थापनशास्त्र विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या संशोधन काळामध्ये त्यांनी एकुण ०३ भारतीय पेटंट डिझाइन नोंदणी यशस्वीपणे डॉ. वायकर सरा समवेत केली आहे.  0२ स्कोपस इंडेक्स रिसर्च पेपर तसेच ०३ रिसर्च पेपर यूजीसी केअर जर्नलच्या संशोधन पत्रात यशस्वीरित्या प्रकाशित केली आहेत.
त्यांच्या १२ वर्षाच्या एकुण शिक्षण क्षेत्रातील योगदाना मध्ये डॉ. गणेश गाडेकर यांनी NAAC समन्वयक,AICTE समन्वयक, DTE समन्वयक,AISHE समन्वयक, शिक्षण शुल्का समिती (FRA) समन्वयक,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी कल्याण अधिकारी , महाविद्यालयीन परीक्षा अधिकारी, संगणक  उपायोजन विभागाचे विभागप्रमुख अश्या विविध प्रकारच्या जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत.
या यशाबाबत डॉ.गणेश गाडेकर यांचे अभिनंदन सिंहगड इन्स्टिट्यूटचे संचालक, SNDT विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. नांदवडेकर, डॉ. अभिजीत शेळके सर,सहकारी प्राध्यापक, परतुर माजी सैनिक संघटनाचे अध्यक्ष तुकाराम जी उबाळे, डॉ. सुधाकर जाधव, डॉ. शेषराव वायाळ, कुटुंबातील सदस्य तसेच मित्रमंडळी यांनी केले. 
या त्यांच्या यशात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे योगदान दिलेल्या सर्वांचे डॉ. गणेश गाडेकर यांनी मनःपूर्वक आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत