सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

राष्ट्रीय बंजारा परिषद महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष पदी अंजेभाऊ चव्हाण यांची निवड


परतूर प्रतिनिधी कैलास चव्हाण
  जालना-तालुक्यातील पाहेगाव येथील रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते अंजेभाऊ चव्हाण यांची राष्ट्रीय बंजारा परिषद महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.ही निवड राष्ट्रीय बंजारा परिषदेचे संस्थापक अध्यक्ष धर्मनेता किसन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय अध्यक्ष विलास राठोड महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष भिकन जाधव,अँड.पंडित‌ राठोड,महाराष्ट्र प्रदेश महासचिव उमेश राठोड ,गोर कलावंत मराठवाडा अध्यक्ष, पंडित महाराज,यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय अध्यक्ष विलास राठोड यांच्या हस्ते नियुक्तीपत्र व शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळीयुवा प्रदेश सचिव श्रीकांत राठोड, युवा मराठवाडा अध्यक्ष राजाराम पवार, युवा कार्याध्यक्ष जालना अजय पवार, मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष संदीप राठोड यावेळी अनेक राज्यातील पदाधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोहरादेवी धर्म पिठ येथे उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत