सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

बाबुराव मामा सतकर यांचे निधन


जालना ( प्रतिनिधी) नरेश अन्ना 
  ज्येष्ठ समाजसेवक, दलित मित्र बाबुराव मामा सतकर ( 78) यांचे शुक्रवारी ( ता. 06) पहाटे दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार असून रामतीर्थ स्मशानभूमीत दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मागील अनेक वर्षांपासून ते गवळी समाजासह इतरही अनेक सामाजासाठी कार्यरत होते. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य शासनाने त्यांना दलीत मित्र हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. 
सामाजिक कार्या बरोबरच अध्यात्मिक क्षेत्रातही त्यांचा मोठा हातभार होता तसेच त्यांना कुस्त्यांची आवड असल्याने जालना शहर आणि जिल्ह्यातील अनेक कुस्तीपटू मल्ल त्यांनी घडविले होते. 
याप्रसंगी खा. डॉ. कल्याण काळे, आ.अर्जुनराव खोतकर ,माजी आ.कैलास गोरंट्याल, नितीन जेथलिया, इकबाल पाशा, महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे प्रदेश सचिव प्रवीण हुंडीवाले,सुनील पै. खरे, ॲड. ब्रम्हानंद चव्हाण, राजेंद्र राख,अंकुशराव राऊत, भाऊसाहेब घुगे, नारायण दादा चाळगे, गजानन गीते, सुदामराव सदाशिवे, व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनीत साहनी, प्रा. सत्संग मुंढे, ॲड. संजय काळबांडे, नंदकिशोर जांगडे, नरेंद्र जांगडे, कॉ.सगीर अहमद, गेंदालाल झुंगे,अश्विन अंबेकर, कमलेश खरे, ह. भ. प. किसन महाराज जाधव,ह. भ. प. एकनाथ महाराज काळे, ह. भ. प. डॉ.ऋषीबाबा शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत