सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

परतूर येथे बी.रघुनाथ पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन


परतूर प्रतीनीधी संतोष शर्मा
  येथील आयुर्वेद प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा तिसरा बी.रघुनाथ पुरस्कार सुप्रसिद्ध कथाकार राम निकम यांना जाहीर झाला असून बुधवारी दि. 5 नाव्हे.2025 रोजी  परतूर शहरात पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ.पृथ्वीराज तौर यांच्या हस्ते तिसरा बी.रघुनाथ पुरस्कार राम निकम यांना प्रदान करण्यात येणार आहे.यावेळी आयोजित सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ.भारत खंदारे यांची उपस्थिती असणार आहे. सुप्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक प्रा.छबुराब भांडवलकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे. 
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका असणाऱ्या मराठी भाषा सल्लागार समितीचे सदस्य असणारे डॉ. पृथ्वीराज तौर यांना वाड्मयीन योगदानासाठी रशियातील मॉस्को मध्ये वर्ल्ड्स रायटर्स असोशियन तर्फे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. पृथ्वीराज तौर यांना विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान केला जाणार आहे. या सोहळ्याला जास्तीत जास्त साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन आयुर्वेद प्रतिष्ठानचे डॉ.दीपक दिरंगे, डॉ.भानुदास कदम यांच्यासह आविष्कार साहित्य मंडळ,अभिरुची साहित्य मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत