सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

न्यू वंडर किड्स इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा

 परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा 
दिनांक 09 जानेवारी 2026 सोमवार रोजी न्यू वंडर किड्स इंग्लीश स्कूल अँड ज्यू. कॉलेज, परतूर येथे महिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या महिला दिनाचे उत्सवाचे उद्घाटन नगराध्यक्षा प्रियंकाताई रक्षे यांच्या हस्ते करण्यात आले सर्व प्रथम जिजामाता भोसले, रमाबाई आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व फित कापून करण्यात आले. याप्रसंगी संस्था मार्गदर्शक पार्वतीबाई सोळंके, सचिव छाया बागल, प्रमुख पाहुणे उपनगराध्यक्षा विशाखा राखे, उपमुख्याध्यापिका पुजा मोरे उपस्थित होते. यावेळी महिलांनी स्वतःच्या आरोग्याचे संरक्षण कसे करावे याचे उत्तम मार्गदर्शन मीरा झरेकर यांनी केले तद्नंतर नीलिमा मसलकर पाल्याच्या संस्काराविषयी भाष्य केले. तसेच  घरकाम सांभाळून नोकरी व व्यवसाय करणाऱ्या कर्तबगार महिलांचा संस्थे तर्फे विशेष सत्कार करण्यात आला. याकार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून नगरसेविका स्नेहा अग्रवाल, नगरसेविका कल्पना डहाळे, संजीवनी खालापूरे, रेवती राखे उपस्थित होते. 
    संस्था अध्यक्ष नारायण दादा सोळंके, मुख्य सल्लागार गणेश सोळंके, मुख्याध्यापक गोविंद पाठक यांनी सर्व उपस्थित महिलांना व महिला पालकवर्गाला महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अहतेशाम खान यांनी केले तर आभार प्रदर्शन किशोरी पाठक यांनी व्यक्त केले.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका शालू पारखे दामिनी टाकणखार, मंगल वेडेकर, गीता पायघन, शारदा चव्हाण, आरती सारस्वत, गोपीनाथ जगदाळे, दिनेश साठे, सुलेमान सय्यद तसेच सेविका ज्योती निलेवाड, पार्वती गुंजमूर्ती आणि सेवक सुखदेव सस्ते उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप परिश्रम केले.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत