Posts

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

समाजाने संतांचे विचार अवगत करावे-प्रदिप फुलमाळी

Image
परतुर/प्रतिनिधी येथील संत रोहिदास महाराज सेवा समिती व राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी सम्राट आशोक मित्र मंडळाचे संतोष हिवाळेप्रमुख पाहूणे नगरसेवक श्रीकांत उन्मुखे,कृष्णा आरगडे  संदिप काळे  होते.यावेळी चर्मकार महासंघाचे युवा नेते प्रदिप  फुलमाळी यांनी संत रविदास महाराजांच्या कार्याची माहिती दिली. समाजाने जागृत होऊन संत रविदास महाराजांचे विचार अवगत करून युवकांनी उच्च शिक्षणाकडे वळावे जेणेकरुन समाजाची प्रगती होईल.सदर कार्यक्रमाला मुन्ना चित्तोडा,सावता जईद,अजय देसाई, ज्ञानेश्वर जईद,गणेश हिवाळे,शंकर ठाकुर,पत्रकार माणिक जैस्वाल,संजय देशमाने ,आदी उपस्थित होते.        कार्यक्रम यशस्वीतेसाठी सतीष हिवाळे,काळे,सुनिल खंदारे आदीनी परीश्रम घेतले

कोरोनाची भीती सर्व सामान्य लोकांनाच का? मनसे विद्यार्थी सेनेचे सिद्धेश्वर काकडे

Image
मंठा (प्रतीनीधी कोरोना ची भीती दाखवत राज्य सरकार महाराष्ट्रात सध्या सर्व सामान्य जनतेला वेठीस धरून राजकारण करीत आसल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धेश्वर काकडे यांनी केला आहे.  पुजा चव्हाण मृत्यु प्रकरणी आपण गुन्हेगार नाही हे सिध्द करण्याचा प्रयत्न ठाकरे सरकार मधील मंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवी संस्थानाचा आधार घेत शक्ति प्रदर्शन करून सर्व सामाण्यांच्या भावना दुखावल्या आसल्याचे मनसेचे सिद्धेश्वर काकडे यांनी म्हटले आहे. वाशीम जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक व जिल्हाधिकारी यांना सस्पेंड केलं पाहिजे व मंत्री संजय राठोड यांच्यावर देखील कार्यवाही करायलाच पाहीजे आशि मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना च्या वतीने मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांना लेखी पत्राद्वारे केली आहे. मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे हे कोरोनाचे नियम पाळावे आसे अहवान करतात आणि दुसरीकडे त्यांचेच मंत्री नियम तोडतात हे मनसे खपवुन घेणार नसल्याचे सिध्देश्वर काकडे यांनी सांगितले आहे.

आधुनिक काळात शिवरायांच्या विचारांचा जागर महत्त्वाचा- कान्होजी जेधे यांचे वंशज राजधीर जेधे यांचे प्रतिपादन,शिवरायांच्या विचारातून आधुनिक राष्ट्राची निर्मिती - इतिहास संशोधक विलास सोनवणे यांचे मत,युवकांनी शिवविचारांचा आणि कर्तृत्वाचा जागर करावा, मोरे पाटील परिवाराचा अत्यंत स्तुत्य उपक्रम - भाजयुमो प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर

Image
मंठा(प्रतिनिधी) आधुनिक काळात शिवरायांचे विचार हेच मार्गदर्शिका असून शिवरायांच्या विचार आणि आचार मार्गावर गेल्यास आधुनिक काळात प्रत्येक जण शोधू शकतो म्हणून आधुनिक काळात शिवरायांच्या विचारांचा जागर खूप महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन शहाजीराजांचे सहकारी मित्र व शिवरायांचे ज्येष्ठ मार्गदर्शक सहकारी कान्होजी जेधे यांचे १४ वे वंशज राजधीर जेधे यांनी केले. शिवरायांचे विचार संपूर्ण जगाच्या पाठीवर अद्वितिय असून शिवरायांच्या विचारावरच आधुनिक राष्ट्राची नवनिर्मिती होऊ शकते असे प्रतिपादन सुप्रसिद्ध इतिहाससंशोधक विलास सोनवणे यांनी केले मोरे पाटील परिवार आयोजित शिवजन्मोत्सव २०२१ निमित्त आयोजित कार्यक्रमात राजधीर जेधे व विलास जी सोनवणे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल भैया लोणीकर होते यावेळी राजधीर जेधे यांना शिवछत्रपती राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार तर विलास सोनवणे यांना शिवस्वराज्य भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला यावेळी संत नामदेव महाराज यांच्या साहित्यावर पीएचडी प्राप्त करणारे डॉ. एकनाथ शिंदे कोरोना काळात प्रभावी काम करणारे ...

वाटुर येथे युवा वारियर्स शाखेच्या नामफलकाचे राहुल लोणीकर यांच्या हस्ते अनावरण,युवा वारियर्स म्हणजे युवकांमधील सुप्तगुणांना संधी देण्याचे व्यासपीठ-प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर

Image
परतुर प्रतिनिधी आज राज्यभरात मध्ये युवा  वारियर्स च्या बाराशे शाखांच्या नामफलकाचे अनावरण होत असून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील व युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सिंहगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून युवा वारियर्स या युवक आतील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या शाखे चे उदघाटन करतानाच राज्यभर  आशा प्रकारच्या शाखांचे2 उद्घाटने होत असल्याचे होत असल्याचे भाजपा युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी वाटुर येथे वटुर पंचायत समिती गणाच्या युवा वारियर्स शाखेच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले यावेळी बोलताना राहुल लोणीकर म्हणाले की युवा अवस्थेतील मुला-मुलींना आपल्यातील नेतृत्व गुण त्याचबरोबर विविध क्षेत्रात असलेली हातोटी व त्यांच्यात असलेले कलागुण यांना या युवा वारियर च्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध होणार आहे त्यामुळे युवकांनी युवा वारियर च्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करावी असेही सांगितले पुढे बोलताना ते म्हणाले की  जास्तीत जास्त युवकांनी युवा वारियर च्या माध्यमातून सक्र...

नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंचांनी गावच्या उन्नतीसाठी प्रयत्न करावे- माजी मंत्री बबनराव लोणीकर, मतदार संघातील 78 ग्रामपंचायती भाजपाच्या ताब्यात

Image
परतूर( प्रतिनिधी )ग्रामपंचायत चा सरपंच हा त्या गावच्या विकासाचा आरसा असून नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांनी गावाच्या विकासासाठी स्वताला झोकून देऊन काम करावी असे आवाहन माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी केले ते परतुर येथे संपन्न झालेल्या सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी उपाध्यक्ष तथा भाजयुमोचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर भाजपाचे ज्येष्ठ नेते मदनलाल शिंगी मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप गोरे भाजपा तालुकाध्यक्ष रमेश भापकर भाजपा मंठा तालुका अध्यक्ष सतीश राव निरवळ जालना तालुका अध्यक्ष प्रकाश राव टकले विलासराव आकात परतूर पंचायत समितीचे सभापती रंगनाथ येवले उपसभापती रामप्रसाद थोरात, जिल्हा परिषद सदस्य पंजाब राजेश मोरे, अंकुशराव बोबडे माऊली शेजुळ बद्रीनारायण खवणे बद्रीनारायण ढवळे बोराडे कैलास बोराडे यांची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना माजी मंत्री लोणीकर म्हणाले की मतदार संघातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी वर दाखवलेला विश्वास सार्थ करण्याची जबाबदारी सरपंच उ...

स्थानिक स्वराज संस्था प्रमाणे व्यापाऱ्यांचा हि एक आमदार असावा -हस्तीमल बंब,परतूर येथे व्यापारी महासंघाची बैठक संपन्न,परतूर व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी राहूल सातोनकर तर सचिव प्रवीण सोमाणी*

Image
परतूर (प्रतीनीधी) स्थानिक स्वराज संस्थे प्रमाणे व्यापारी महासंघाचे  स्वंतत्र आमदार  विभाग स्तरावर  आसावा  आसी मागनी  व्यापारी महासंघाचे परतूर येथे झालेल्या बैठकित जालना जिल्हाध्यक्ष हस्तीमल बंब यांनी  केली      याप्रसंगि व्यासपिठावर प्रमुख पाहूणे म्हणून व्यापारी महासंघाचा जिल्हा सहसचीव जगन्ननाथ थोटे,वीजयकुमार सुराना उपस्थित होते         पूढे बोलतान बंब म्हणाले कि ज्या प्रमाणे स्थानीक स्वराज संस्था चे वीभाग स्तरावर आमदार आसतो त्याच प्रमाणे व्यापारी मतदार संघाचा स्वंतत्र आमदार आसवा  जेने करून व्यापारी यांच्या समस्येवर वीधानभनात आवाज उठेल व व्यापाऱ्याच्या समस्यावर तोडगा निघेल    यावेळी परतूर तालूका व्यापारी महासंघाची नवीन कार्यकारणिची घोषणा करण्यात आली यामधे, सर्वानूमते राहूल सातोनकर याची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली सचिव प्रवीण सोमाणि उपाध्यक्ष महेश दहिवाळ,अनील वाशिंबे कोषाध्यक्ष जुबेर तंबोली तर सह सचिव गोपाल दरगड  यांचा समावेश करण्यात आला ====================== माझ्या वर टाकलेला वीश्व...

स्व.किशोर अग्रवाल यांना पत्रकारांची श्रध्दांजलीशहरातील चौकात पुतळा उभारण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देणार-विकासकुमार बागडी

Image
जालना,दि.13 (प्रतिनिधी) रुपम ग्रुपचे चेअरमन, ज्येष्ठ समाजसेवक स्व. किशोर अग्रवाल यांना आज शनिवारी असोसिएशन ऑफ स्मॉल अ‍ॅण्ड मिडीयम न्यूज पेपर्सच्या जालना जिल्हा शाखेच्यावतीने शहरातील हॉटेल मधुबन येथे झालेल्या शोक सभेत भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. दरम्यान, यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकासकुमार बागडी म्हणाले की, स्व. किशोर अग्रवाल यांची समाजसेवा खर्‍याअर्थाने वाखण्याजोगी होती. गरिबांना मदत करणे हा त्यांचा छंद होता. लॉकडाऊनच्या कार्यकाळातही त्यांनी भरघोस अशी मदत केलेली आहे. त्यांची ही सेवा विसरण्याजोगी नाही.  त्यांच्या पासून इतरांनाही प्रेरणा मिळावी म्हणूनच त्यांची प्रतिमा शहरातील एखाद्या चौकात उभारुन त्या चौकाला स्व. किशोरसेठ अग्रवाल असे नाव देण्यात यावे, अशी आपण संघटनेच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांसह सर्व संबंधितांकडे करणार असून तशा आशयाचे निवेदनही उद्या सोमवारी देणार असल्याचे यावेळी संंघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. विकासकुमार बागडी यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लियाकतअली खान यांनी केले. तर शोकसभेस रवि अग्रवाल, राम अग्रव...