Posts

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

आनंद डेलिकेटेड कोरोना हेल्थ सेंटरचे उदघाटन येत्या रवीवारी ना.राजेश टोपे यांच्या हस्ते

परतूर(प्रतीनीधी) परतूर शहर व ग्रामीण भागातील कोरोनाग्रस्त रुग्णांची गरच लक्षात घेता शिवछत्रपती शिक्षण व क्रीडा मंडळाच्या सहभागातून आनंद शाळेच्या इमारतीत 'आनंद डेडिकेटेड कोरोना हेल्थ सेंटर ' सुरू होत आहे . याचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जालना जिल्हयाचे पालकमंत्री मा. राजेश भैया टोपे साहेब यांच्या हस्ते दि. 02 मे 2021  रविवार रोजी सकाळी 10 वा होत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे वक्ता प्रशिक्षण विभागाचे प्रदेश अध्यक्ष मा.प्रदीपदादा सोळंके उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा.आ.सुरेशकुमार जेथलिया , मा. राहुल लोणीकर , मा.कपिल आकात, मा. अशोक आघाव  उपस्थित राहणार आहेत. या रुग्णालयासाठी डॉ.प्रमोद आकात, डॉ.भानुदास कदम , डॉ.मुनीर कादरी, डॉ.गजानन केशरखाने , डॉ. कुणाल उढाण , डॉ.शरद पालवे रुग्ण सेवा देणार आहेत.            या रुग्णालयात सुरुवातीला 24 ऑक्सिजन व 21नॉन ऑक्सिजन बेड राहणार आहेत. रुग्णांच्या गरजेनुसार यात वाढ केली जाईल. तरी या रुग्णालयाचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन शिव...

भारतीय जनता पार्टी चे नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष संदीपजी बाहेकर यांची कोविड रुग्णाच्या कुटुंबियांना मदत,माजी मंत्री बबनराव लोणीकर व युमो महामंत्री राहुल लोणीकर यांच्या सूचनेवरून राबवला उपक्रम

परतूर येथे कोविड सेंटर मध्ये ऍडमिट रुग्णांच्या नातेवाईकांना मदत व्हावी या उद्देशाने भाजपा चे नगरसेवक तथा माजी उपनगराध्य संदीपजी बाहेकर यांनी माजी मंत्री बबनराव लोणीकर व युमो महामंत्री राहुल लोणीकर यांच्या सूचनेवरून परतूर कोविड सेंटर येथे ऍडमिट असलेल्या रुग्णाच्या कुटुंबियांची जेवणाची व्यवस्था करून, सामाजिक उत्तरदायित्व निभावण्यासाठी पुढाकार घेतला असून परतूर येथे रोज सकाळ संध्याकाळ कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांना डब्बा पुरवण्याचे काम ते करत आहेत.  या संदर्भात संदीप बाहेकर म्हणाले की या कठीण प्रसंगी हॉटेल बंद असून रुग्णांच्या नातेवाईकांना जेवण उपलब्ध होत नाही हा विचार करून माजी मंत्री बबनराव लोणीकर व युमो प्रदेश सरचिटणीस राहुल भैय्या लोणीकर यांच्या सूचनेवरून आपण ही सेवा करीत असल्याचे सांगितले   पुढे संदीप बाहेकर म्हणाले की, आज कठीण परिस्थिती असून,या काळात आपण खंबीरपणे उभे राहून जनतेला धीर देण्याची गरज असून या साठी आपण हा उपक्रम राबवत असल्याचे ते म्हणाले

परतूर येथे संजीवनी कोविड रुग्णालयाचे उद्घाटन,युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या हस्ते झाले उद्घाटन,सातोनकर हॉस्पिटल व युवा मोर्चाने घेतला पुढाकार

Image
परतुर (प्रतिनिधी ) संजीवनी हॉस्पिटल चे संचालक डॉक्टर प्रदीप सातोनकर व भाजयुमो च्या वतीने परतूर येथे संजीवनी डी सि एच सी कोविड रुग्णालयाचे उद्घाटन भाजयुमोचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी  भाजपाचे जेष्ठ नगरसेवक सुधाकरराव सातोनकर, डॉक्टर प्रदीप सातोनकर, डॉक्टर गायकवाड वैद्यकीय अधिकारी डॉक्टर डी आर नवल, युवा मोर्चा सरचिटणीस संपत टकले ,भाजयुमो तालुकाध्यक्ष शत्रुघन कणसे नगरसेवक प्रकाशराव चव्हाण, नगरसेवक कृष्णा आरगडे ,नगरसेवक जगन बागल ,युवा मोर्चा तालुका सरचिटणीस रवी सोळंके राजेंद्र मुंदडा माऊली सोळंके, श्याम सुंदर चितोडा, प्रशांत बोनगे ,किशोर कद्रे यांच्यासह संचालक  प्रवीण सातोनकर यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना राहुल लोणीकर म्हणाले की राज्यभरामध्ये कोरोना ची भयावह स्थिती असून अशा स्थितीमध्ये शहरातील सर्वच रुग्णालयांच्या खाटा भरलेल्या आहेत  यामुळे अनेक रुग्णांना उपचाराअभावी प्राण गमवावे लागत आहेत मात्र ग्रामीण भागातील रुग्णांच्या समस्या लक्षात घेऊन सातोनकर हॉस्पिटल व युवा मोर्चाने पुढाकार घेत परतूर येथे कोविड सेंटर सुरू केल्याने ब...

सातोनकर हॉस्पिटल व भाजयुमो च्या वतीने परतूर येथे कोविड हॉस्पिटल,माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते होणार उदघाटन

परतूर (प्रतिनधी) डॉ प्रदीप सतोनकर व भारतिय जनता युवा मोर्चा च्या वतीने कोरोना चा वाढता प्रभाव लक्षात घेऊन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस,माजी मंत्री बबनराव लोणीकर,युवा मोर्चा प्रदेशध्यक्ष विक्रांत पाटील युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल भैय्या लोणीकर यांच्या सूचनेवरून  भाजपा नगरसेवक सुधाकर सतोनकर यांचे चिरंजीव डॉ प्रदीप सातोनकर(M.B.B.S.,DCH) व प्रवीण सातोनकर यांच्या सह डॉ.बाबासाहेब गायकवाड (M.B.B.S.DCH,DNB) दिल्ली,हे परतूर येथे 30 बेड असलेले कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रवीण सातोनकर यांनी दिली आहे. सदरील संजीवनी कोविड सेन्टर चे उद्घाटन माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते दिनांक 28 रोजी करण्यात येणार असून या वेळी भाजयुमो प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे      युमो प्रदेशमहामंत्री राहुल लोणीकर यांनी परतूर शहरात हॉस्पिटल सुरू व्हावे या करिता डॉ प्रदीप सातोनकर यांच्याशी चर्चा करून हॉस्पिटल सुरू करण्या संदर्भात निंर्णय घेण्यात आला   या हॉस्पिटलमध्ये 14 ऑक्सिजन बेड, 16 आयसुलेशन बेड उपलब्ध राहणार असून ग्रामीण भ...

मनसेच्या प्रयत्नाला यश, संजीवनी हॉस्पिटलची होणार चौकशी

Image
जालना शहरातील संजीवनी हॉस्पिटलमध्ये काळा बाजार व गोर गरीब रुग्णांची आर्थिक लुट व तसेच रुग्णांना चांगले ऊपचार  मिळत नसल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धेश्वर काकडे यांनी जालना जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केली आसता. जालना जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी यांचे स्विय्य सहाय्यक खेडेकर यांनी पत्र काढुन येत्या दोन ते तीन दिवसामध्ये जालना येथील संजीवनी हॉस्पिटलची चौकशी करुन हाॅस्पीटलचा कारभार व हाॅस्पीटलचा रेकॉर्ड मनसेचे सिद्धेश्वर काकडे यांना देणार आहेत. तसेच जालना जिल्ह्यातील ज्या रुग्ण नातेवाईक यांना ईतर ठिकाणी हाॅस्पीटल व ईतर समस्यांचा सामना करावा लागत आसेल तर आपल्याशी संपर्क साधावा कोरोना  काळामध्ये वाढणारे हॉस्पिटलचे बिल व मदत केली जाईल आसी माहीती काकडे यांनी दिली आहे.

22 एप्रिल रात्री ८ वाजेपासुन 1 मेपर्यंत राज्यात कडक लाँकडाऊन,अत्यावश्यक सेवा व्यतरीक्त जील्हा बंदी घोषित तर लग्न संभारंभास केवळ दोन तासच .

       ( वृतसेवा )    नवे निर्बंध -खालीलप्रमाणे राज्य सरकार, केंद्र सरकार आणि स्थानिक प्रशासनाशी संबंधित सर्व सरकारी कार्यालये फक्त १५ टक्के कर्मचारी क्षमतेने कार्यरत राहतील. कोरोनाशी संबंधित अत्यावश्यक सेवांच्या कार्यालयांना यातून वगळण्यात आले आहे.अत्यावश्यक सेवेत नसलेले मात्र १३ एप्रिल रोजी जाहीर झालेल्या आदेशांमध्ये अपवाद म्हणून वगळण्यात आलेल्या कार्यालयांना १५ टक्के किंवा ५ कर्मचारी यापैकी जी संख्या जास्त असेल, त्या क्षमतेने कार्यरत राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. प्रत्यक्ष लोकांपर्यंत अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या आवश्यकतेनुसार १०० टक्क्यांपर्यंत वाढवण्याची परवानगी असेल.लग्नसमारंभ फक्त एकाच हॉलमध्ये २ तासांमध्येच पूर्ण करावे लागतील. यासाठी एकूण २५ लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी असेल. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कुटुंबाला ५० हजार रुपये दंड तर हॉलवर कोरोनाची परिस्थिती सामान्य होईपर्यंत बंदी घालण्यात येईल. *बसेस सोडून सर्व खासगी प्रवासी वाहतूक पर्यायांना फक्त अत्यावश्यक कारणासाठीच प्रवासी वाहतूक करता येईल. त्यासाठी चालक आणि एकूण प्...

कोरोना काळात गलथान कारभाराचे अजून किती बळी सरकारला हवेत? नाशिक ऑक्सिजन गळतीवर माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचा सवाल,नाशिक ऑक्सिजन गळती प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा, महाराष्ट्रातील सर्व ऑक्सिजन उपलब्ध असणाऱ्या हॉस्पिटलची तात्काळ तज्ज्ञांच्या माध्यमातून तपासणी करा - लोणीकरांची मागणी*===================

Image
जालना(प्रतिनिधी ) नाशिकमध्ये आधीच ऑक्सिजनची कमालीची कमतरता असताना नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीच्या पाईप लाईनला बुधवारी (दि. २१ एप्रिल) बारा- साडेबारा वाजेच्या सुमारास गळती लागली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अग्निशमन दलाचे कर्मचारी या घटनेवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या रुग्णालयातील अनेक रुग्ण ऑक्सिजनवर व व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. या दुर्घटनेमुळे ऑक्सिजन गळतीमुळे २२ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती मिळाली आणि मन अगदी सुन्न झालं आहे. कोरोना काळात गलथान कारभाराचे अजून किती बळी सरकारला अपेक्षित आहेत? असा सवाल करत या ऑक्सिजन गळती प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर नाशिक ऑक्सिजन गळती प्रकरणानंतर केली आहे. मागील २ महिन्यातील हि तब्बल ८ वी घटना असून कोरोना काळात सरकारच्या गलथान कारभारामुळे, बोगस किटचा वापर करणे त्यामुळे पॉझिटिव्ह नसताना कोरोना पॉझिटिव्ह येणे किंवा आजच्या घटनेप्रमाणे मृत्यूचा सामना करावा लागतो आहे. त्यातच तब्बल २ तास ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने पर...