Posts

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

तळणी : मंठा तालुक्यातील तळणी येथे गणेशोत्सवाच्या निमित्य महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकार विदर्भरत्न ह भ प पूरूषोत्तम महाराज पाटील यांच्या एकदिवसीय हरी किर्तनाचे आयोजन तळणी  परीसरातील प्रसिद्ध युवा उद्योजक शरद पाटील व भगवान देशमुख याच्या वतीने या किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते जगदगुरु तुकाराम महाराज यांच्या    *आपुला तो एक देव करुनी घ्यावा* *तेणे विन जिवा सुख नोहे* *येरती माईक दुःखाची जनीती* *नाही आदी अंती अवसान*  या अभंगावर सुंदर निरूपण केले सध्य स्थितीचा काळ हा मानव जातीच्या परीक्षेचा काळ आहे धर्ममंडपात बसलेली लोक ही खरच भाग्यवान आहेत कोरोना सारख्या महामारीत आपंण जिवंत आहोत या महामारीतून जर आपल्याला वाचायचे असेल तर धार्मीक विचाराचा आधार आपल्याला घ्यावाच लागेल महामारीच्या काळात वारकरी सप्रदायच खूप मोठा आधार आहे सध्य स्थितीत मानव जातीची मानसीक अवस्था सक्षम असणे गरजेचे आहे कोरोना ने मानवी जीवनातील गरजा कीती कमी आहेत यांची जाणीव आपल्या सगळ्याना करून दीली आहे  मनुष्याच्या आयुष्यातील नामसाधना ही त्याच्यासाठी खूप मोठा आधार असते परतू आज काल तीच साधना करण्याचा आळस आ...

निम्नदुधना'ची चौदा दारे उघडली ३०३२४ क्युसेक्सचा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

Image
परतूर (प्रतिनिधी)  निम्न दुधना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सोमवारी दुपारपासून जोरदार झाली. धरण शंभर टक्के भरल्याने सोमवारी सायंकाळी साडे सहा ते मंगळवारी (२१ सप्टेंबर) पहाटे दीड वाजेपर्यंत बारा दरवाजे, तर सकाळी आठच्या सुमारास विसर्ग वाढविण्यात आला. एकूण चौदा दारे ०.६० मीटरने उघडून ३०३२४ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू  करण्यात आला आहे.  यामुळे सेलू- देवगाव फाटा मार्गे औरंगाबाद, जिंतूर कडे जाणारी वाहतूक तसेच अतिवृष्टी व मोठ्या विसर्गाने पूरस्थिती निर्माण झाली आहे.मंगळवारी सकाळी सहा वाजेपर्यंत धरण परिसरात गेल्या २४ तासांत ४८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ५४६४ क्युसेक्स दराने धरणात पाणी आले असून सकाळी साडे सहा वाजेपर्यंत १३.३६७ दशलक्ष घनमीटर पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील जालना जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला. रात्री आठपासून दहा वाजेपर्यंत लाभक्षेत्रातही ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. पहाटे चार वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम होता. धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत आहे. धरण शंभर टक्...

परतूर शहरात फुलले ब्रम्हाकमळ....हिमालयातील फुलाच्या राजा आहे देव पुष्प

Image
परतूर(प्रतीनीधी) सन्मित्र कॉलनी तहसील कार्यालय मागे श्री चंद्रकांत गाडेकर यांच्या निवासस्थानी ८ वर्षांपुर्वी पुणे येथून २०१३ ला ब्रम्हकमळचे रोप आणुन लावले होते. ते आज रोजी ते उमलले.  हिमालय फुलांचे सम्राट/राजा म्हणून ओळखले जाणारे दुर्मिळ देवता फूल म्हणजे ब्रह्मकमल आता परतुर च्या सन्मित्र कॉलनीत फुलले आहे. सन्मित्र कॉलनीतील रहिवासी श्री चंद्रकांत गाडेकर यांच्या घरी या देवपुष्पाने / ब्रम्हाकमळने त्यांचे दर्शन दिले आहे. यापूर्वी हे दिव्य फूल  आजुबाजूच्या परिसरात उमलले होते असे आढळून आले नाही. असे मानले जाते की ब्रम्हाकमळ  हे देवी -देवतांचे फूल आहे, ज्यांच्यामध्ये स्वतःमध्ये अमर्याद अलौकिक शक्ती व औषधी गुणधर्म आहेत.हे फूल वर्षातून फक्त एकदाच मध्यरात्री फुलते आणि पहाटेच्या आधी बंद होते. जेव्हा हे फूल फुलते, तेव्हा त्याचा अलौकिक सुगंध देखील संपूर्ण वातावरणात पसरतो. या फुलाचे दर्शन स्वतःच नशीबाचे प्रतीक आहे आणि त्याच्या दर्शनाच्या वेळी केलेल्या इच्छा पूर्ण होतात असा समज आहे. ब्रम्हाकमळ देव फूल फक्त हिमालयीन प्रदेशातील 12,000 फूट उंचीच्या डोंगरांवर आढळतो आ...

डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याचे मुख्य सूत्रधार अजूनही मोकाटच फिरत आहेत,त्यांना कधी पकडणार-जिल्हा उपाध्यक्ष कल्याण बागल

Image
परतूर (प्रतीनीधी) डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आठ वर्षे पूर्ण झाली आहे सीबीआयने त्यांच्या मारेकऱ्यांवर आरोपपत्र दाखल केले आहे मात्र,मुख्य सूत्रधार अजूनही मोकाटच फिरत आहेत. त्यांना कधी पकडणार,असा सवाल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे  जालना जिल्हा उपाध्यक्ष कल्याण बागल यांनी केला.   महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा परतुरच्या वतीने डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त डॉ.नरेंद्र दाभोलकर  हत्येच्या मुख्य सुत्रधारांना पकडण्यात यावे याकरिता उपविभागीय कार्यालय परतूर येथे निवेदन देण्यात आले होते याप्रसंगी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जालना जिल्हा उपाध्यक्ष कल्याण बागल बोलत होते याप्रसंगी  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे परतूर तालुका अध्यक्ष एकनाथ कदम,जिल्हा प्रधान सचिव रमाकांत बरीदे,संभाजी तांगडे,दिलीप अण्णा मगर,सुनील खरात,अश्विन गुंजकर,लक्ष्मीकांत माने,देशमुख के.एन.,संतोष रनबावळे यांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना कल्याण बागल म्हटले की,विज्ञानवादी समाजसुधारक डॉ.दाभोलकर,कॉ.गोविंद पानसरे, प्रा.कलबुर्गी आणि गौरी...

खरीप हंगाम संपत आलाय तरी बँकेतून शेतकर्‍यांना पीक कर्ज मिळेना,परतूरच्या स्टेट बँकेची शेतकर्‍यांना उडवाउडवी,बँकेतील कर्मचारी व गार्ड करतात शेतकर्‍यांना आरेरावीची भाषा**पीककर्जाचे प्रकरने तात्काळ निकाली काढा अन्यथा गाठ शिवसेनेशी- शहर प्रमुख दत्ता पाटील

Image
परतूर(प्रतिनिधी) चालु वर्षीचा खरीप हंगाम संपत आलाय तरी परतूर परिसरातील शेतकर्‍यांना अजुन स्टेट बँकत पीककर्जासाठी चकराच माराव्या लागत आहेत.कुठल्याना कुठल्या कारणावरून कर्मचारी कामचुकार पणा तसेच पीककर्जासाठी चालढकल करतांना दिसत आहेत.आॅगस्ट महिण्याची 10 तारीख उजडली तरी शेतकर्‍यांना पीककर्ज काही वाटप होतांना दिसत नाही किंवा अत्यंत संथ गतीने वाटप होत असून पिक कर्ज वाटपामध्ये अनियमीतता होत असल्याचा आरोप शिवसेना शहर प्रमुख दत्ता पाटील सुरूंग यांनी स्टेट बँकेच्या विभागिय कार्यालयाला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे.  निवेदनात प्रामुख्याने म्हटले आहे की शेतकऱ्यांचा खरीप हंगाम चालु होऊन बरासा कालावधी उलटला तरी बँक काही ना काही कारणाने शेतकर्‍यांना पीककर्जासाठी वेठीस धरत आहे. पेरणीसाठी शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता असतांना परतूरच्या भारतीय स्टेट बँक  मधून गेल्या दोन महिन्यापासून शेतकऱ्यांना वेळेवर पिक कर्ज मिळक नाही . त्यामुळे शेतकरी हवालदील झाला असून परतूर शाखेमध्ये शेतकरी हा दोन - दोन महिन्यापासून शेतीची कामे सोडुन बँकेत चकरा मारीत आहे . त्यांना पिक कर्ज मिळकत नाही व काही...

जाहिरातबाजीवर १६० कोटींची खैरात, कर्जबाजारी शेतकरी वाऱ्यावर! - भाजपा नेते माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची ठाकरे सरकारवर टीका,राज्यसरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पिक विमा कंपनी "मालक" झाली त्यामुळे यावर्षी पीकविमा मिळणारच नाही ! -लोणीकर

Image
परतूर (प्रतिनिधी ) केवळ शब्दांची आतषबाजी करणाऱ्या ठाकरे सरकारने शेतकऱ्यांच्या फसवणुकीत आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. अतिवृष्टी, वादळांसारख्या संकटात अगोदरच भरडलेल्या शेतकऱ्यास मदतीचा हात देण्याऐवजी स्वतःच्या जाहिरातबाजीवरच एकशे साठ कोटींची उधळपट्टी करून ठाकरे सरकारने शेतकऱ्यास उद्ध्वस्त केले आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे नेते माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. महाविकास आघाडी सरकारने मोठ्या थाटात राज्यातील संकटग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची गर्जना विधिमंडळात केली, त्याला दीड वर्ष उलटून गेल्यानंतरही शेतकऱ्याच्या पदरात कर्जमाफी पडलेलीच नाही. खोट्या जाहिरातींवर एकशे साठ कोटींची उधळपट्टी करण्याऐवजी १५० कोटी रुपये कर्जमाफीसाठी दिले असते, तर संकटग्रस्त शेतकऱ्यास दिलासा मिळाला असता. राज्यातील शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन कर्जमुक्त करण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली होती. प्रत्यक्षात मात्र वीज दरवाढीचे धक्के देऊन शेतकऱ्यास वेठीस धरले जात आहे, पीकविम्याबाबतही विमा कंपन्यांशी साटेलोटे करून शेतकऱ्याची फसवणूक केली जात आहे, असा आरोप ...

परतूर शहराच्या विकासासाठी ५ कोटी निधी द्या - मोहन अग्रवाल यांची नगरविकास मंञ्याकडे मागणी

Image
परतूर /प्रतिनिधी शिवसेनेचे जिल्हा संघटक तथा परतुर नगरपालिकेचे विरोधी पक्ष गटनेते मोहन अग्रवाल यांनी शिवसेना नेते तथा माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली परतुर शहराच्या विकास कामासाठी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शहराच्या विकासासाठी ५ कोटी रुपये निधी मंजूर करा, अशी मागणी निवेदनाद्वारे मंत्रालयात जाऊन प्रत्यक्षात नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून केलीआहे. परतुर शहराचा रखडलेला विकास पाहता शहरातील विविध भागात विकासकामा अभावी नागरिकां  बेहाल होत असून शहरातील  भुयार गटार योजनेमुळे गल्लोगलीत फुटलेले रस्ते स्वच्छतेचा आभाव व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या नंतर शिवसेनेचे मोहन अग्रवाल यांनी  नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन  शहर विकास कामासाठी 5 कोटी रुपयाचा निधी मंजूर करावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी शिवसेना नेते तथा माजी मंत्री अर्जुनराव खोतकर व उपजिल्हाप्रमुख पंडितराव भूतेकर यांची उपस्थिती होती.