Posts

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

शिवसेनेच्या मेळाव्याला अधिक संख्येने उपस्थित राहा - मोहन अग्रवाल

Image
परतूर (प्रतीनीधी): आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने तालुक्यातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन रविवारी सकाळी ११ वाजता शहरातील वरद विनायक लोन्स येथे करण्यात आले आहे. राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या मेळाव्याचे उद्घाटन माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते केले जाणार आहे. या मेळाव्याला जिल्हा संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, परभणीचे खासदार संजय जाधव, बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, मेहकरचे आमदार तथा पंचायतराज समितीचे अध्यक्ष डॉ.संजय रायमुलकर, माजी आमदार शिवाजीराव चोथे, जिल्हा प्रमुख भास्करराव आंबेकर, ए.जे. बोराडे, माजी आमदार संतोष सांबरे, बुलडाणा जिल्हा प्रमुख बळीराम मापारी, रामेश्वर नळगे, उपजिल्हा प्रमुख माधवराव कदम, बाबासाहेब तेलगड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. तालुक्यातील शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा संघटक मोहन अग्रवाल यांनी केले. शनिवारी दुपारी २ वाजता शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्ह...

भानुदासराव चव्हाण वरीष्ठ महाविद्यालयात लसीकरण शिबीर संपन्न

Image
परतूर - दिनांक  29आक्टोबर 2021 रोजी येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग  व  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यास केंद्र मार्फत मिशन युवा स्वास्थ्य अंतर्गत कोव्हक्सिन लसीकरण कार्यक्रम यशस्वी पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे अध्यक्ष मा. श्री. दिनकरराव चव्‍हाण  यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. ज्ञानदेव नवल (वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, परतुर),  डॉ. दीपक तारे (नोडल अधिकारी लसीकरण ग्रा. रुग्णालय परतुर)  तसेच महाविद्यालयाचे संचालक मा. श्री. संतोष चव्हाण , प्राचार्य शंकर चव्हाण  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे केंद्र संयोजक प्रा. प्रदीप चव्हाण, याबरोबरच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. लिंबाजी कदम ,श्री गजानन कास्तोडे  उपस्थित होते. या प्रसंगी वैद्यकीय रूग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. या लसीकरण शिबिरास विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.  एकूण  63 व्यक्तींना लस देण्यात आली. या ...

आमदार लोणीकर यांचा एसटी कामगारांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा,दिवाळीपूर्वी एसटी कामगारांच्या मागण्या मान्य करा नसता विधान भवनात सरकारची लक्तरे वेशीवर टांगू,माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचा इशारा

Image
प्रतिनिधी परतूर येथे एसटी कामगारांच्या विविध मागण्या संदर्भामध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी पाठिंबा दिला असून दिवाळीपूर्वी एसटी कामगारांच्या सर्व मागण्या मान्य करा नसता विधान भवनामध्ये सरकारची लक्तरे वेशीवर टांगूत असा इशारा प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी दिला आहे    या पत्रकार माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी पुढे म्हटले आहे की कोरोना संकटाच्या काळामध्ये या एसटी कामगारांनी खूप मोठी सेवा केली आहे मात्र हे राज्यातील सरकार यांच्या मुख्य प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असून यामुळे राज्यभरामध्ये 28 कामगारांनी आत्महत्या केल्या सत्तेच्या नशेत मशगुल असणाऱ्या सरकारला तुटपुंज्या पगारावर काम करणाऱ्या कामगारांचे दुःख दिसत नसून अतिशय अल्प वेतनावर काम करणाऱ्या अनेक राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांव कर्जाचा डोंगर आहे अशातच प्रशासन व राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्यामुळे देय असलेले घर भाडे नियमानुसार बसणारा ग्रेड पे देण्याचे मान्य करण्यात आलेली असूनही सरकार मात्र जाणीवपूर्वक या कामगारांचा छळ करीत असल्याचा आरोप मा...

जलयुक्त शिवारला राज्यसरकार क्लीनचिट म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकारचं काम सर्वोत्तम यावर महा विकास आघाडीचे शिक्कामोर्तब- माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर,जलयुक्त शिवार वरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर चिखलफेक करणाऱ्यांना चपराक-लोणीकर

Image
देगलूर(प्रतीनीधी) तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे जलयुक्त शिवार सारखे महत्त्वाकांक्षी योजना पूर्णत्वास गेले असून शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहण न करता देखील मोठ्या प्रमाणात पाणी साठवले जाऊ शकते व त्याचा उपयोग शेतीसाठी खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतो जलयुक्त शिवार योजनेत कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार न होता अत्यंत प्रामाणिकपणे केवळ शेतकऱ्यांसाठी काम करण्यात आले होते जलयुक्त शिवार योजनेला मिळालेला क्लीनचिट मुळे तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या सरकारचं काम सर्वोत्तम होतं यावर विद्यमान महा विकास आघाडी सरकारने शिक्कामोर्तब केला आहे असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले आहे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवारला आज जलसंधारण विभागाकडून क्लीनचिट मिळालेली आहे. या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून या योजनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याबाबत महा विकास आघाडी सरकारने आग्रह धरला होता त्या आग्रहाखातर जलयुक्त शिवार योजनेची तपासणी करण्यात आली या योजनेमुळे पाणी पातळी कमी झाली शेतकऱ्यांचं नु...

ग्राहकांनी डिजिटल सेवांच्या माध्यमातून कॅशलेस व्यवहार करावा-क्षेत्रीय प्रबंधक अभिजीत पांगरीकर यांचे आवाहन

Image
  परतूर ( प्रतिनिधी) आजच्या आधुनिक काळात ग्राहकांनी बँकिंग व्यवहार करतांना डिजिटल सेवांच्या माध्यमातून कॅशलेश व्यवहार करून बँकिंग सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन एसबीआय बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक अभिजीत पांगरीकर यांनी केले. परतूर येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत ग्राहक मेळाव्यात ग्राहकांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जालना विभागीय मुख्य प्रबंधक अभिनय भांबुर्डेकर, प्रबंधक अतुल सावजी, उपविभागीय पोलिस अधिकारी आर.डी. मोरे, मुख्य शाखा व्यवस्थापक सुधीरकुमार वाकोडे, एकनाथ कदम उपस्थित होते. यावेळी संवाद साधतांना क्षेत्रीय प्रबंधक अभिजीत पांगरीकर म्हणाले की ग्राहकांने आजच्या डिजिटलच्या जमान्यात वावरत असतांना बँकेच्या डिजिटल सेवांची माहीती घेऊन कॅशलेश असा सुलभ व्यवहार करावा. यामधून वेळ आणि मेहनत वाचणार आहे. बँकच्या अधिकृत घोषित केलेल्या अपचा वापर करावा. बँक ग्राहकांच्या सुरक्षा आणि हितासाठी तत्पर आहे.      तसेच प्रबंधक अतुल सावजी बोलताना म्हणाले की बँकिंग डिजिटल सेवा मध्ये कार, गृह, यासह आदि कर्ज योजना या डिजिटल बँकिंग सेवामध्ये समाविष्ट केल्या आहेत....

माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे भाकीत खरे ठरले, पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांचे अर्ज फेकले उसाच्या शेतात,राज्य सरकारने दलाली खाल्ल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही- लोणीकर यांचा सरकारवर हल्लाबोल

Image
देगलूर(प्रतिनिधी) जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे शेतकरी संवाद दरम्यान माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी पिक विमा कंपन्या शेतकऱ्यांना पीक विमा देण्यास तयार नाहीत राज्य सरकारने यामध्ये दलाली खाल्ली आहे असा घणाघाती आरोप केला होता ऑनलाईनचा फार्स निर्माण करून शेतकऱ्यांना पीक विमा द्यायचा नाही अशी कंपनीची मानसिकता असल्याचे देखील त्यावेळी लोणीकर यांनी सांगितले होते शेतकऱ्यांचे अर्ज ऑनलाइन होत नसतील तर ऑफलाइन पद्धतीने अर्ज जमा करा संबंधित अधिकाऱ्यांकडे तहसील कार्यालयात येऊन जमा करा व प्रत्येक अर्जाची पोच पावती घ्या अन्यथा पीक विमा कंपन्या तुमचे अर्ज गोदावरीच्या बंधाऱ्यात फेकून देतील आणि शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही असे म्हटले होते ती माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे हे भाकीत तंतोतंत खरे ठरले असून  आंतरगाव ता.नायगाव जि.नांदेड येथील शेतकऱ्यांचे पिक विमा कंपनीकडे भरण्यात आलेले ऑफलाईन अर्ज कंपनीने चक्क उसाच्या शेतात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्य सरकारने पिक विमा कंपनीशी केलेल्या करारामुळे पिक विमा कंपन्या मालक आणि दलाली खाणारे राज्य सरकार गुलाम झ...

दलाली खाल्ल्यामुळे पिक विमा कंपन्या मालक आणि राज्य सरकार गुलाम बनले - माजी मंत्री आमदार बबनराव लोणिकर,अशोक चव्हाण यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये, पिक विमा कंपनीशी केलेल्या चुकीच्या कराराबाबत राज्यसरकारच जबाबदार - लोणीकर

देगलूर(प्रतिनिधी) पिक विमा कंपनी राज्य सरकारशी करार केलेला आहे तो करार करताना राज्य सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने करार केला आहे या करारानुसार जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या यंत्रणेने केलेले पंचनामे पीक विमा कंपन्यांना मान्य नाहीत त्यामुळे पीक विमा कंपनी मालक आणि राज्य सरकार गुलाम बनले आहे अशा शब्दात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला पिक विमा कंपनीशी करण्यात आलेल्या चुकीच्या कराराबाबत केंद्र सरकार जबाबदार असून केंद्र सरकार मुळीच पिक विमा मिळत नाही असा आरोप काल अशोक चव्हाण यांनी देगलूर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आयोजित सभेत केला होता समाचार घेताना लोणीकर यांनी अशोक चव्हाण यांनी केलेले आरोप खोडून काढा राज्यसरकारने दलाली खाऊन पिक विमा कंपन्यांचे गुलाम बनले आहेत असा घणाघाती आरोप केला. तत्कालीन मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात पिक विमा कंपन्यांशी केलेला शेतकऱ्यांच्या हिताचा होता म्हणून सातत...