Posts

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांची मिशन कवच कुंडल लसीकरणास भेट ,खरपुडी येथे लसीकरण संपन्न

Image
जालना (समाधान खरात ) ः जालना तालुक्यातील खरपुडी जि.प शाळेत दि.15 डिसेंबर बुधवार रोजी लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, मुख्याधिकारी मनुज जिंदल, तहसिलदार श्रीकांत भुजबळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर,  डॉ. परवेज कुरेशी, गट विकास अधिकारी एस.  व्ही कराड, गट विकास अधिकारी  सुनिल कुलकर्णी यांनी भेट देवून मार्गदर्शन केले तसेच लसीकरणामध्ये गावामध्ये उत्तम प्रकारे जनजागृती होवून लसीकरणाचा पुर्ण टप्पा केल्याबद्दल सर्व कर्मचार्‍यांचे व आरोग्य कर्मचार्‍यांचे विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, मुख्याधिकारी मनुज जिंदल यांनी अभिनंदन केले. यावेळी उप सभापती समाधान शेजुळ, सरपंच अरुण गिरी, उपसरपंच भरत शेळुज, ग्रामसेवक आर. बी. कोथळकर, तलाठी शेख आय. ए, आरोग्य सेवक शरद पारसकर, ग्रा. सदस्य योगेश उजेड, सदस्य नकुल वाघ, सदस्य समाधान खरात, सदस्य राम देठे, सदस्य कैलास देठे, सदस्य उमेश काळे, आरोग्य, अधिकारी, सी. एच ओ. त्रिशला कदम, एस. आर. निर्मळ, कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी तसे...

आ.बबनराव लोणीकर यांना पितृशोक

Image
 परतूर (प्रतीनीधी)माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर  यांचे वडील तथा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांचे आजोबा दत्ताराव श्यामराव यादव (लोणीकर) यांचे दिनांक 15 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुले आमदार बबनराव लोणिकर,सुनिल  एक मुलगी इंदूबाई देशमुख सुना नावंड, पातरूड असा मोठा परिवार आहे त्यांचा अंत्यविधी दिनांक 15 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता त्यांच्या मुळ गावी  लोणि खुर्द तालुका परतुर येथे होणार आहे

माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी सोहळ्याचे औचित्य साधून तळणि येथे दोन दिवसीय सप्ताहाची सांगता

Image
मंठा(रवी पाटील)तालुक्यातील तळणी येथे संत शिरोमणी माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी सोहळ्याचे औचित्य साधून माऊली ज्ञानेश्वर महाराज मंदीर येथे दोन दीवसीय सप्ताह ची सांगंता आज ब्रम्हचारी ह भ प सुधाकर शास्त्री मुळे याच्या काल्याच्या किर्तनाने झाली संत नामदेव महाराज यांच्या *अष्टोत्तर शे वेळ समाधि निश्र्चळ पूर्वी माझी स्थळ वहनाखाली ॥१॥ उठविला नंदी शिवाचा ढवळा उघडली शिळा विवराची* या अभंगावर निरुपण केले या समाधी सोहळ्याच्या निमित्याने माऊलीच्या अधिकाराविषयी महारiजानी उपस्थीताना मञमुग्ध केले ज्ञानोबारायाचे सामर्थ्य हे ज्ञानोबारायाकडेच होते माऊली कडे जात असताना थोडासा विचार करून गेले पाहिजे कारण कुठलीही गोष्ट करत असताना ती अधिकार सपन्न होऊन केली तर तिचे फळ निश्चत मिळते आणि तिच गोष्ट जर आपण अधिकार सपन्न होऊन केली नाही तर तिचे फळ मिळत नाही सध्याचे वारकरी खरोखरच भाग्यवान आहेत की आपल्याला जीवंत संतांचा सहवास लाभला आहे त्याचे नामस्मरण करण्याचे सौभाग्य आपल्याला प्राप्त होत आहे भगवान ज्ञानोबाराय यांची समाधी आणि जगदगुरू तुकाराम महाराज सदैव वैकूठ गमन या दोनही संताचा सध्याचा स...

ई श्रम कार्डच्या माध्यमातून नागरिकांना मिळणार विविध सरकारी योजनेचा लाभ-अविनाश राठोड

Image
सरकारला "ई श्रम कार्ड" द्वारे ओबीसी  चा डाटाबेस तयार  करता येईल., तो डाटाबेस सर्वोच्च न्यायालयात दाखल करून पुन्नच आरक्षण टिकू शकेल... अविनाश राठोड मंठा(सूभाष वायाळ) तालूक्यातील नायगाव ग्रामपंचायत आणि केंद्र सरकार च्या कॉमन सर्विस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने "ई श्रम कार्ड" काढण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.हे उपक्रम पुढील तीन दिवस चालणार असून या शिबिराच्या माद्यमातून कॉमन सर्विस सेंटर चे ऑपरेटर एकनाथ जाधव, आकाश आढे आणि आकाश राठोड यांनी 16 ते 59 वयातील  अनेक नागरिकांचे "ई श्रम" कार्ड काढून तें पोर्टल वर रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे.नागरिकांना या माद्यमातून 12 अंकी UAN नंबर मिळणार असून या मुळे गरीब लोकांचा डेटा बेस सरकार कडे जामा होणार आहें.या योजनेच्या माध्यमातून शेतकरी,घरेलू नैकर ,आशा वर्कर, वाहनचालक इतर कामगारांना विविध सरकारी योजनेचा लाभ होणार असल्याचे अविनाश राठोड यांनी सांगितले. त्या मध्ये प्रधानमंत्री श्रम  मानधन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना, इतर योजनेचा लाभ होणार आहे. पुढे त्यांनी ...

मंठा पशुवैद्यकीय दवाखान्याची दयनीय अवस्था अधिकारी व कर्मचारी सतत गैरहजर

Image
 मंठा (सुभाष वायाळ) दि. 14 मंठा हे तालुक्याचे ठिकाण असून मंठा या ठिकाणी राज्य शासनाचा पशुवैद्यकीय दवाखाना अस्तित्वात आहे. या दवाखान्या वर शहरातील व बरेच शे खेडेगावातील जनावरे, पशुपक्षी वैद्यकीय उपचारासाठी अवलंबून आहेत. राज्य शासनाने लाखो रुपये खर्चून सुसज्ज अशी इमारत बांधली आहे.परंतु या दवाखान्यामध्ये व आजूबाजूचा परिसरात घाणीचे साम्राज्य आहे व हा परिसर पूर्णपणे अस्वच्छ आहे. यामध्ये अधिकारी व कर्मचारी यांचा नाकर्तेपणा स्पष्ट दिसून येतो. शेतकऱ्यांना शेतीतील काम धंदा सोडून जनावरांना या दवाखान्यामध्ये घेऊन यावे लागतात. तसेच जवळपासच्या खेड्यांमधून सुद्धा या दवाखाना मध्ये जनावरे घेऊन येतात. परंतु त्या ठिकाणी कर्मचारी अधिकारी उपस्थित नसतात.या दवाखाना मध्ये कुठल्याही प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध असल्याचे दिसून येत नाहीत तसेच तेथील अधिकारी व कर्मचारी सतत गैरहजर असतात. शेतकऱ्यांना हा त्रास सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांना नाईलाजास्तव खाजगी वैद्यकीय उपचार करावा लागतो. व नाहक भुर्दंड भरावा लागतो. वेळीच उपचार न मिळाल्यामुळे जनावरे दगावण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले ...

वीज आणि अन्य प्रश्नांवरून शेतकऱ्यांचा केला जाणारा छळ कदापि सहन करणार नाही माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचा राज्य सरकारला इशारा,केंधळी बरबडा येथील 33 केव्ही उपकेंद्राचे लोणीकर यांच्या हस्ते लोकार्पण,राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर नाही - लोणीकर यांचा राज्य सरकारवर आरोप

Image
तळणि(रवी पाटील) महाराष्ट्रात सत्तेत असणारे महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रश्नावर तिळमात्र देखील गंभीर नसून विविध माध्यमातून फक्त वसुली करण्याचे काम सरकार करत आहे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आश्वासन देणाऱ्या या सरकारने वीज आणि अन्य प्रश्नांवरून शेतकऱ्यांचा छळ करू नये शेतकऱ्यांचा केला जाणारा छळ आम्ही कदापि सहन करणार नाही असा स्पष्ट इशारा माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी राज्य सरकारला दिला आहे केंधळी बरबडा येथे लोणीकर यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात (2 कोटी 50 लक्ष रुपये) मंजूर केलेल्या 33 केव्हीच्या लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते यावेळी मंचावर भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल भैया लोणीकर भाजपा जालना जिल्हा उपाध्यक्ष गणेशराव खवणे सभापती संदीप भैय्या गोरे अंकुशराव बोराडे बाबुरावजी शहाणे भाजपा मंठा तालुकाध्यक्ष सतीशराव निर्वळ जि प सदस्य पंजाबराव बोराडे पंचायत समिती उपसभापती नागेशराव घारे जिल्हा परिषद सदस्य शिवदास हानवते नाथराव काकडे कैलास बोराडे विश्वनाथराव कवळे अंकुशराव कदम निवास देशमुख माऊली वायाळ मुस्तफा पठान सुभाषराव घारे प्...

शेतकऱ्याच्या पांढऱ्या सोन्याची मंठा जिनिंग मालकाकडून दिवसाढवळ्या शेतकऱ्यांची लूट

Image
 मंठा (सुभाष वायाळ) मंठा तालुक्यामध्ये चार खाजगी कापूस खरेदी जिनिंग आहेत. या सर्व जिनिंग मध्ये शेतकऱ्यांनी काबाडकष्ट व अहोरात्र मेहनत करून पिकवलेले शेतकर्‍याचं पांढर सोन म्हणजेच अर्थात कापूस हा कवडीमोल किमतीमध्ये खरेदी केला जात आहे. या खाजगी कापूस खरेदी जिनिंग मालकांची  परिसरातील शेतकऱ्यांमध्ये एवढी मोठी दहशत निर्माण झाली आहे की त्यांच्या विरोधात तक्रार करण्यासही कोणीही पुढे येईना.याची कारणेही अनेक आहेत यामध्ये शेतकऱ्याचा अडाणीपणा म्हणा किंवा नाहक त्रास महणा परत आणखी एक कारण आहे की शेतकऱ्याचा कापूस  खरेदी केल्यानंतर नगदी रक्कम घ्यायची असेल तर शेकडा दोन ते तीन रुपये कमी दिले जातात. व चेकद्वारे रक्कम घ्यायची असेल तर  पूर्ण रक्कम दिली जाते. परंतु याही गोष्टीला सामान्य शेतकऱ्यासाठी तीन ते चार महिने लागतात. मंठा तालुक्यातील जिनिंग  मधील कापसाचे दर आणि शेजारील तालुक्यातील कापसाचे दररोजचे दर पाहिले असता  कापसाचे 1 नंबर, 2 नंबर,3 नंबर अनुक्रमे 800 रुपये, 500 रुपये, 300 एवढा मोठा फरक भावा मध्ये दिसून येत आहे. व एवढ्या मोठ्या कमी फरकाने मंठा ख...