Posts

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

परतुर येथील धम्मदिप विहारात नामांतर दिनी शहिदांना अभिवादन

Image
परतूर/हनूमंत दंवडे परतुर दि 14/01/2022 रोजी परतुर येथील धम्मदिप बुध्द विहारात नामांतर दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला भारतीय बौध्द महासभेचे ता.अध्यक्ष रामचंद्रजी पानवाले हे होते,सुञसंचालन व विधी भारतीय बौध्द महासभेचे बौध्दाचार्य हेमंत पहाडे यांनी घेतले या प्रसंगी डाँ.सुनिल पडागळे यांनी नामांतरा विषय आपले मनोगत व्यक्त केले या वेळेस विशाखा महिला मंडळांनी नामंतराचे गाणे गाऊन अभिवादन केले या प्रसंगी नारायण गवई,साहेबराव मानकर,बन्सी शेळके ,बन्सी शेळके सुदामराव गवळी,सनी गायकवाड,नरेश कांबळे,सतीष गवळी,नरेश सोनवने पुष्पाबाई वाघमारे,कोंडाबाई शेजुळ,विमलबाई गवई,शांताबाई शेळके,प्रमिला पाईकराव नंदाबाई धनले, तारामती खरात,जयश्री खरात,जमदाडे ताई वंदाना साळवे,अरुणा पवार,शितल गवळी व धम्मदिप बुध्द विहाराची कमिटी उपस्थित होते

मंठा तालूक्यातील ९०% अनुदान जिल्हा बँकेकडून शेतकर्याना वाटप ,अतिवृष्टीचेअनूदान वेळेवर,मिळाल्याने शेतकर्यात समाधान

तळणी (रवी पाटील)मंठा तालूक्याती चारही जिल्हा  मध्यवर्ती बॅंकेच्या माध्यमातून वेगाने  वाटप .करण्यात आले असल्याने शेतकरी वर्गामध्ये समाधान व्यक्त करण्यात आले  खरीप हंगामाच्या शेवटी शेवटी झालेल्या अतिवृष्टी मृळे सपूर्ण तालुक्यात मोठे नुकसान झाले होते या नुकसान भरपाई पोटी शासनाने पॅकेज देऊन थोडाफार आधार दीला असुन अनुदान त्वरीत शेतकर्याच्या खात्यामध्ये जमा करून त्याना ते वाटप करण्यात जि़ल्हा मध्यवर्ती बँकेचे मोठे योगदान आहे हे अनुदान वाटप चालु असतानाच प्रधानमंत्री शेतकरी सन्मान नीधीचा दोन हजार रुपयाचा २०२१चा शेवटचा हप्ता सुध्दा याच दरम्यान आला अपूरे कर्मचारी व कोरोनाचे नियम पाळून हे वाटप. सुधा बहुतांश शेतकर्याना वाटप करण्यात आल्यानतर लगेचच काही शेतकर्याना पीक विमा मंजूर झाला तो सुध्दा वाटप करण्यात आला नुकसानीच्या तुलनेत ही रक्कम शेतकर्यासाठी कमी जरी असली तरी विविध लाभातून शेतकर्याना मिळालेली मदत ही वेळेवर मिळाल्याने त्या मदतीचा मोठा आधार दीवाळी सणासाठी  व रब्बीच्या लावगडी साठी शेतकर्या ना आधार झाली  अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे राज्य शासनाकडून दोन टप्यात देण्याचे न...

नगरपरिषद परतूर मध्ये पाणीपुरवठा विभागाचे तीन तेरा नऊ बारा अभियंता घाटेकर असून अडचण नसून खोळंबा

Image
परतूर / हनुमंत दवंडे     परतूर नगर परिषद चे पाणी पुरवठा विभाग म्हणजे तमासगीर यांचा खेळ झालेला आहे. पाणीपुरवठा विभागाचे अभियंता घाटेकर यांच्या मनमानी कारभारामुळे शहरातील पाणीपुरवठा कोलमडलेली आहे. घाटेकर हे एक तर ऑफिस मध्ये नसतात त्यांना मोबाईलवर कॉल केल्यावर कॉल घेत नाहीत मोंढा भागातील पाण्याच्या टाकी मागे गेल्या तीन-चार महिन्यांपासून नागरिकांना अर्ध्या भागात पाणी मिळत नाही घाटेकर यांना मोबाईलवर अनेकदा सूचना केल्या असतात दोन दिवसात करतो एक दिवसात करतो असे उडवाउडवीचे उत्तर देतात परत फोन केल्यावर फोन रिसीव्ह करीत नाहीत .बऱ्याच दिवसांपासून या भागातील नागरिक पाण्यामुळे त्रस्त झालेले आहे नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे जर नागरिकांना विकतच पाणी घ्यायचा असेल तर नगर परिषद पाणी पुरवठा विभागातील अभियंता घाटेकर यांच्यावर का खर्च करत आहे हेच कळत नाही  तसेच नागरीकांनी ही नळपट्टी का भरावी हा प्रश्न निर्माण होत आहे मुख्यअधिकारी यांना फोन लावल्यास त्वरित फोन उचलून संबंधित कर्मचाऱ्यांना पाठवतात परंतु यामधील टेक्निकल प्रॉब्लेम जो आहे तो अभियंता घाटेकर यांनाच म...

जय जवान, जय किसान' संघटनेची बैठक संपन्न

Image
जालना (समाधान खरात)शासकीय विश्रामगृह जालना येथे 'जय जवान, जय किसान' संघटनेची बैठक आज संपन्न झाली. या बैठकीचे आयोजन जय जवान जय किसान संघटनेचे जालना जिल्ह्याध्यक्ष ज्ञानेश्वर भुसारे यांनी केले होते. या बैठकीला प्रमुख उपस्थिती म्हणून जय जवान जय किसान संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत हे उपस्थित होते. त्यांनी या ठिकाणी आलेल्या संघटनेच्या सैनिकांना मार्गदर्शन केले. ब्रिगेडियर सुधीर सावंत म्हणाले की, जय जवान जय किसान या संघटनेच्या माध्यमातून शेतकरी व तरुणांसाठी खूपच चांगल्या प्रकारे काम जालना जिल्ह्यात सुरु आहेत. आपल्या संघटनेची व्याप्ती वाढविणे गरजेचे आहे. सतत आपण आपले काम सातत्याने सुरू ठेवणे गरजेचे आहे. आपण समाजात काम जर सुरू ठेवले तरच आपली प्रगती होईल व आपल्या संघटनेचे काम पण चांगल्या प्रकारे सुरू ठेवता येईल. आपल्या संघटनेच्या प्रत्येक सैनिकांने कोणत्याही कामात स्वतः पुढाकार घेणे गरजेचे आहे. सतत समाजात महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी व शेतकऱ्यांचे प्रश्न निर्माण होत आहेत. या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आपण लढले पाहिजे. गोरगरिबांच्या मदतीसाठी...

जिजाऊ जयंती विशेष

Image
मंठा (सुभाष वायाळ) दि.12 जानेवारी हा दिवस स्वराज्याचे स्वप्नण साकार करणार्‍या स्वाभिमानी जाधवांची कन्या तर भोसल्यांची सून राजमाता जिजाऊंची जयंती स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी राजे आणि प्रताप शादी संभाजीराजे या दोन छत्रपतींना घडविणाऱ्या मातेचा हा जन्मदिवस. आई ही जगातील महान योद्धा आहे आई म्हणजे प्रेम आपुलकी, त्याग, सहनशीलता, प्रेरणा, जिद्द, संयम आणि सामर्थ्य यांचा संगम आहे आणि या सर्व गुणांचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे स्वराज्य जननी जिजाबाई शहाजीराजे भोसले म्हणजेच राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ. राजमाता जिजाऊंनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिवाजी महाराजांना घडविले. जिजाऊंनी शिवरायांच्या मनात स्वराज्याची कल्पना जागवली मुघलांच्या अन्यायाच्या पर्दा फाश करण्यासाठी स्वतःचे राज्य स्थापन करण्याचे महत्त्व त्यांना कळले. स्वराज्य निर्माण करण्यासाठी त्यांनी शिवराया मध्ये नितांत श्रद्धा निर्माण केली. जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी १५९८ रोजी महाराष्ट्रातील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील शिंदखेड गावात झाला त्या मराठा लखोजी राजे जाधव आणि माळसा राणी यांच्या कन्या होत्या. सिंदखेड...

मंठा शहरात राजमाता माँ जिजाऊ जयंती उत्साहात साजरी

Image
मंठा(सुभाष वायाळ) दि.12 मंठा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दि.१२बुधवार रोजी विविध सामाजिक संघटना व धर्मवीर शंभुराजे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला शहरातील व परिसरातील नागरिकांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स आदी गोष्टीचे काटेकोरपणे पालन करून साजरी केली. विविध सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली. यामध्ये राजमाता शिक्षण प्रसारक मंडळ व राजमाता अर्बन मंठा तर्फे माँ जिजाऊ जयंती, स्वामी विवेकानंद जयंती, सावित्रीबाई फुले जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या सुरुवातीला माॅसाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेस व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जिजाऊ वंदना घेण्यात आली. व मान्यवरांनी जिजाऊच्या जीवनावर प्रकाश टाकला.या प्रसंगी संस्थाध्यक्ष डिगांबर बोराडे, नितिन राठोड, अचित बोराडे,वैजनाथ बोराडे ,कृष्णा खरात,संजय बोराडे ,डॉ.देवडे, प्रा.शेळके,संदिप बोराडे,प्रा.ज्ञानेश्वर वायाळ, शिवाजी जाधव,बाळासाहेब ...

येणारा येथे राष्ट्रमाता जिजाऊ यांची 424 वी जयंती साजरी करण्यात आली..

परतूर प्रतीनिधी/ हनुमंत दवंडे परतूर तालुक्यातील येनोरा येथे राष्ट्रमाता जिजाऊ यांची 424 वी जयंती साजरी करण्यात आली. ज्या शूर माता- पुरूषांनी आपल्या देशाचे नाव इतिहासात अजरामर केले अथवा ज्यांनी आपल्या कर्तबगारीने अनेक यशस्वी रण गाजवले ,त्यांच्या कृृत्याचे कितीही स्मरण केले तरी त्यांच्या ऋणातून सर्वस्वी मुक्त होणे कठिण आहे. राष्ट्रमाता ,राजमाता जिजामाता यांचा जन्मोत्सव साजरा करण्यामागे हीच कृतज्ञतेची भावना आहे. राष्ट्रातील या महान राजमाता लोकमाता आणि राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचे स्मरण हे राष्ट्रीयत्व कायम राखण्यास चांगले साधन आहे. असे यावेळी बोलताना भागवत  भूंबर सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  यावेळी रमेश भाऊ भुंबर,नाथाभाऊ शिंदे,भागवतदादा भुंबर,भास्करराव साळवे, दिगंबर गायकवाड, अर्जुन मोरे, अशोक दवंडे,  पांडुरंग भुबर, वैष्णव भुबर कृष्णा तौर यावेळी उपस्थित होते...