Posts

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

Image
तळणी प्रतिनिधी ( रवी पाटील) तळणी येथील दोन गरजूंना आज ग्रामपचायत सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यानी आर्थीक मदत केली दोनही कुंटूबं अत्यंत गरीब असून त्याना समाजाच्या मदतीचा आधार होणे गरजेचे आहे माणूसकीच्या नात्यातून व त्याची आर्थीक दुर्बलता यामुळे बघून अशा गरजूना समाजाच्या माध्यमातून मदत होण्यासाठी या दोघांनी पुढाकार घेऊन एक माणूसकी जपण्याचा नविन पांयडा सुरू केला असल्याने व त्यानी केलेल्या मदतीमुळे ते कौतूकास पाञ आहेत  गावातील एक गरीब कुटुब महादेव गुडघे अत्यंत कष्ट या कुटुबांन सोसले महादेवराव याचे दोन तिन वर्षा पूर्वीच निधन झाले दोन मुल मुलीची जबाबदारी आईकडे आली त्याना दोन मुली एकीचे लग्न झाले तर दुसर्या मुलीचे लग्न काही दिवसावर येऊन ठेपले असल्याने आर्थीक जुळवाजुळव सुरु झाली सामाजीक कार्यात अग्रेसर असणारा पांडूं अण्णा व गौतम सदावर्ते सरपंच जेव्हा हा विषय कळाला की लगेच त्या कुटुंबासाठी आर्थीक मदत उपलब्घ करून दिली  दुसरे कुटूबं दताञय पारसकर यांचे स्वःत गंवडी काम करणारा दताञयला काम करत असतानाच अर्धागवायूचा तीव्र झटका आल्याने त्याचा एक ...

माविम मार्फत परतूर तालुकास्तरीय सुधारक सन्मान कार्यक्रम संपन्न झाला.

Image
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण  महिला आर्थिक विकास महामंडळ जि. जालना मार्फत तेजस्विनी लोकसंचलित साधन केंद्र परतूर, आणि सावित्रीबाई लोकसंचलित साधन केंद्र,आष्टी ता परतूर जि. जालना येथे नवतेजस्विनी प्रकल्पांतर्गत Gender & Nutrition उप घटकाच्या अमलबजावणी साठी Gender Sensitive Role Model Award म्हणून तालुकास्तरीय सुधारक सन्मान कार्यक्रम संपन्न झाला. महिलांच्या विकासा करिता उल्लेखनिय कार्य व विशेष सहकार्य केल्या बद्दल पुरुषांचा मान्यवरांच्या हस्ते तालुकास्तरीय सुधारक सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले  कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून झाला सोबतच सी एम आर सी व्यवस्थापक यांचे मार्फत प्रास्ताविक व माविम च्या कामाची माहिती देण्यात आली तसेच उपस्थित प्रमुख पाहुणे मान्यवर यांचे स्वागत सी एम आर सी व्यवस्थापक व स्टाफ मार्फत करण्यात आले तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महिला बचत गटांना सहकार्य करणारे किंवा गाव स्तरावरील महिलांना मदत करणारे तालुक्यातील 60 गावातील निवड करण्यात आलेल्या 55 पुरुषांना सुधारक सन्मान...

तळणी बस स्टँन्ड परीसरातील दाेनशे हॉर्स पावर क्षमतेचे रोहीञ जळाले

Image
तळणी प्रतिनिधी रवी पाटील       मंठा तालूक्यातील तळणी येथील तळणी बस स्टँन्ड परीसरातील दाेनशे हॉर्स पावर क्षमतेचे रोहीञ वादळी वारे व विजाच्या कडकडाटाने क्षतिग्रस्त झाल्याने गेल्या तीन दिवसापासून बस स्टँन्ड परीसरातील विजपूरवठा खंडीत झाला असल्याने नागरिक ञस्त आहेत बस स्टँन्ड परीसरात शासकीय बँका विविध सहकारी बँका विद्युत उपकरणावर चालणारे अनेक व्यावसाईक अनेक हॉस्पीटल याच परीसरात येत असल्या विद्युत पूरवठा खंडीत झाल्याने अनेक सेवा तीन दिवसापासून ठप्प आहे तळणी हे मोठे बाजार पेठेचे गाव असून अनेक गांवाचा सपर्क हा रोज तळणी येथे येतो तळणी बस स्टँन्ड परीसरात अनेक व्यापारी असून विज पूरवठा सतत खंडीत होत असल्याने या परीसरातील विद्युत ग्राहक नेहमीच या अडचणीचा सामना करत आहेत तळणी गाव भागातील अनेक भागात एबी केबल टाकले असून अनेक भागात ते टाकणे गरजेचे आहे तळणी गावचा वाढता विस्तार पाहता त्या रचनेनुसार विज विद्युत यञणां व्यवस्था सुध्दा वाढणे गरजेचे आहे गावात मोठ्या प्रमाणात अधिकृत विज बील ग्रांहकांची सख्या मोठी आहे विज बीलांचा भरणा सुध्दा मोठ्या प्रमाणात होतो त्या तूलनेत येथे विद्...

मेहकर दरेगाव जालना बस पूर्वत करा अन्यथा आंदोलन- मनसे

Image
सिंदखेडराजा प्रतीनीधी समाधान सरकटे मेहकर येथून ग्रामीण भागातून धावत जाणारी जालना ही बस सेवा काही दिवसा अगोदर चालू होती. परंतु अचानक बंद केल्यामुळे ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, महिला यांचे हाल होत आहे .     मराठवाड्याला जोडणारा जालना हे मोठे शहर असून तेथे मोठी बाजारपेठ आहे. या शहरापर्यंत ही बस धावत होती. अनेक व्यापारी या बसने प्रवास करत पंरतु ही बस बंद करण्यात आली असल्याने अनेकांचे हाल होत आहे. ही बस पूर्ववत करावी अशी मागणी मेहकर आगार व्यवस्थापक यांच्याकडे वारंवार करण्यात आली. पंरतु आता जर बस पूर्ववत करण्यात नाही आली तर मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल व मेहकर आगारातून एकही बस बाहेर न पडू देण्याचा इशारा निवेदनात नमूद केला असून निवेदनावर मनसे पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. अशी माहिती मनसे प्रसिद्धी प्रमुख राधेश्याम बंगाळे याांनी दिली आहे.

तळणी परीसरात गारपीटीने कांदा पिकाचे व उन्हाळी भाजीपाल्याचे अतोनात नुकसान

Image
तळणी .. प्रतिनिधी ( रवि पाटील )      तळणी परीसरातील तळणी कानडी उस्वद लिबंखेडा कोकंरबा वडगाव ( स ) शिरपूर इंचा टाकळखोपा वाघाळा दुधा सासखेडा आदी गावात गारपीटीने कांदा पिकाचे व उन्हाळी भाजीपाल्याचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हैराण झाला आहे ऐन भरात आलेल्या कांदा या पिकांचे लाखोच्या घरात नुकसान झाले विविध कंपन्या सोबत करार करून शेतकर्यानी उन्हाळी कांदा पिकाचे उत्पादन जोमात घेतले होते तळणी परिसरातील जवळपास पंधरा गांवात अनेक शेतकर्यानी कांदा उत्पादन घेण्यासाठी मोठी मेहनत केली सपूर्ण एप्रिल महिन्यात कमी अधिक प्रमाणात बेमोसमी पावसाची हजेरी तळणी परीसरात लागतच होती पंरतूं . काल वार गुरूवार रोजी संध्यांकाळी पाच वाजलेल्या सुमारास तुफान पावसाला सुरवात झाली पाऊस पडल्यानंतर तुफान गारांचा तंडाखा बसल्याने कांदा भाजीपाला व उशीरा पेरलेली ज्वारी भुईसपाट झाली पावसाळ्यात ज्या प्रमाणे पाऊस पडतो त्याच प्रमाणे मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्या विषेश करुन पूर्णा नदी पाञाच्या काठावरील अनेक शेतकरी भाजीपाल्याची शेती करतात पंरतू काल झालेल्या बेमोसमी पावसामुळे शेतकर्यान...

परतुर महेश्वरी महिला मंडळाच्या तालुकाध्यक्षपदी सुनीता सोनी तर सचिव पदी मंगल पोरवाल

Image
    परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण   दिनांक 26 रोजी परतूर येथील बालाजी मंदिर मध्ये परतुर माहेश्वरी महिलांचा एक बैठक झाली या बैठकीमध्ये नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली ही निवड तीन वर्षाकरिता निवड करण्यात आलेली आहे या निवडीमध्ये तालुका अध्यक्षपदी सौ सुनिता सोनी तर सचिव पदी सौ मंगल पोरवाल यांची निवड करण्यात आली        जिला उपाध्यक्ष पदी ममता मंत्री उपाध्यक्ष सौ सीमा राठी व सौ प्रेमा दरगड़ सहसचिव किरण मालपानी कोषाध्यक्ष सौ कल्पना लोया सहकोषध्यक्ष सौ किरण तापड़िया संघटन मंत्री सौ कविता दरगड़ सौ सीमा भूतड़ा तर सल्लागर पदी सौ विमलताई जेथलीया रेखा झंवर सौ ममता मंत्री यांची निवड यावेळी करण्यात आली   ही निवड जालना जिल्हा सभा माहेश्वरी महिला मंडळ व परतुर सभा माहेश्वरी महीला मंडळ यांच्या पदाधिकाऱ्यानी केली     या निवडी बदल माहेश्वरी महीला मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला

शहरात भगवान परशुराम जन्मोत्सव उत्साहात साजरा

Image
   परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण      दी.22 रोजी शहरातील गायत्री मंदिर येथे भगवान परशुराम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला             सर्वप्रथम भगवान परशुराम यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले नंतर गायत्री माता यांच्या आरतीने सुरुवात करण्यात आली गायत्री माता यांच्या आरती नंतर भगवान परशुराम यांची आरती घेण्यात आली या आरतीनंतर समाजातील संस्कृत मध्ये पीएचडी प्रदान केलेले डा.प्रतीक प्रमोद जोशी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी त्यांचे वडील प्रमोद जोशी यांचाही सत्कार करण्यात आला     नंतर प्रसाद स्वरूपात अल्पोपहार व थंड पेय देण्यात आले      या वेळी श्याम खंडेलवाल मुरली देशमुख राधेश्याम दायमा सतीश देशपांडे बालाप्रसाद ओझा प्राध्यापक प्रमोद टेकाळे रतन दायमा सुरेश जोशी डॉक्टर नंद राजेश खंडेलवाल विठ्ठल कुलकर्णी नंदकुमार कुलकर्णी योगेश खंडेलवाल दुर्गेश पोतदार श्यामसुंदर चितोडा राम देशपांडे अश्विन दायमा शिवा जोशी अविनाश कुलकर्णी सुनील पारिक शाम डंख नटवर खंडेलवा...