Posts

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

परतूरकरांसाठी सुवर्णसंधी : कोठाळकर हॉस्पिटलतर्फे २१ जून रोजी भव्य मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा  ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांना उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा एकाच छताखाली मिळाव्यात या उद्देशाने, येथील प्रसिद्ध 'कोठाळकर हॉस्पिटल क्रिटीकेअर व दातांचा दवाखाना' (आय.सी.यू. / ट्रॉमा व इमर्जन्सी सेंटर) च्या वतीने भव्य 'मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबिराचे' आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार, दि २१ जून २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले असून, परिसरातील नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोठाळकर हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये जालना आणि परतूर येथील विविध रोगांवरील तज्ज्ञ व नामांकित डॉक्टर रुग्णांची मोफत तपासणी व उपचार करणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विष्णू एच. भुते, आर. व्ही. मेडीकेअर, जालना), मेंदू विकार तज्ज्ञ डॉ. प्रल्हाद धारूरकर, न्यूरे सर्जरी, परिनिका न्युरोकेअर, जालना), अस्थिरोग व फ्रॅक्चर तज्ज्ञ डॉ. अरविंद म्हस्के, विघ्नहर्ता हॉस्पिटल, जालना), किडनी विकार तज्ज्ञ डॉ. संदीप प. देशमुख, आशुतोष हॉस्पिटल, जालना), डॉ. सतिश चव्हाण, चव्हाण हॉस्पिटल, परतूर), डॉ. अर्जु...

परतूर लायन्स क्लबचा ११ वा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न! अध्यक्षपदी महेश होलानी, सचिवपदी कैलास तांगडे तर कोषाध्यक्षपदी नरपत जांगीड यांची निवड

Image
 परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा  येथील मुंदडा फंक्शन हॉलमध्ये परतूर लायन्स क्लबचा ११ वा दिमाखदार पदग्रहण सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात क्लबच्या आगामी वर्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे महेश होलानी यांच्याकडे, सचिवपदाची सूत्रे कैलास तांगडे आणि कोषाध्यक्षपदाची सूत्रे नरपत जांगीड यांच्याकडे अधिकृतपणे सोपविण्यात आली. या कार्यक्रमासाठी इन्स्टॉलेशन ऑफिसर म्हणून सेकंड सेंचुरी ॲम्बेसिडर व माजी मल्टिपल कौन्सिल चेअरमन दिलीप मोदी उपस्थित होते. तर नवीन सदस्यांना शपथ देण्यासाठी इंडक्शन ऑफिसर म्हणून रिजन चेअरपर्सन लायन जयश्री लड्डा यांनी भूमिका बजावली.  नूतन कार्यकारिणी व पदाधिकारी: या सोहळ्यात केवळ मुख्य त्रिमूर्तीच नव्हे, तर क्लबच्या इतर महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनीही शपथ घेतली: उपाध्यक्ष: राहुल सातोंनकर टेमर: संतोष शिंदे टेलर ट्विस्टर: तुकाराम उबाळे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स: डॉ. सकलेचा, डॉ. नंद, डॉ. कदम, बबनराव उन्मुखे आणि डॉ. संदीप चव्हाण.  'हे' आहेत आगामी वर्षातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प: पदभार स्वीकारल्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष महेश होलानी यांनी आपल्य...

अपर पोलिस अधीक्षक यांची तालुका जालना पोलीस ठाणे हद्दीमध्ये खरपुडी शिवार मोठी कारवाई, खरपुडी शिवारात अवैध वाळू साठ्यावर धाड अंदाजे 300 ते 350 ब्रास वाळू जप्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात   जालना तालुक्यातील खरपुडी शिवार येथे अवैधरित्या साठवून ठेवलेल्या वाळूवर पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली. सदर कारवाईदरम्यान अंदाजे ३०० ते ३५० ब्रास वाळूचा साठा आढळून आला असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. अवैध वाळू उपसा, वाहतूक साठवणुकीविरोधात जिल्हा पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून अशा प्रकारच्या बेकायदेशीर व्यवसायावर सातत्याने कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.  महसूल विभागाच्या समन्वयाने वाळू साठ्याचे मोजमाप करून त्याची किंमत निश्चित करण्यात येणार असून संबंधितांवर नियमानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व साठवणुकीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमे अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, यापुढेही अशा प्रकारच्या कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. सदरची कारवाई मा. श्री. विक्रम साळी, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात सपोनी योगेश खटकळ, पोलीस अंमलदार गायकवाड तसेच स्थानिक गुन्हे शाख...

सिंगोना येथील मयत पांडुरंग कदम यांच्या वारसाला एसबीआय बँकेकडून ४० लाखांचा विमा धनादेश सुपूर्द,दोन हजार रुपयांच्या पॉलिसीने कुटुंबाला दिला आर्थिक आधार

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा  तालुक्यातील सिंगोना येथील रहिवासी पांडुरंग अंजीराम कदम (वय ४२) यांचे गतवर्षी २३ नोव्हेंबर २०२५ रोजी सिंगोना पाटीवर झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी निधन झाले होते. त्यांनी भारतीय स्टेट बँकेची (एसबीआय) अवघ्या दोन हजार रुपयांचा प्रिमियम भरून जनरल इन्शुरन्स अपघाती विमा पॉलिसी काढली होती. त्यांच्या या अपघाती निधनानंतर बँकेने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत अत्यंत तत्परतेने त्यांच्या वारसाला तब्बल चाळीस लाख रुपयांचा अपघाती विमा मंजूर केला.   या मंजूर विमा रक्कमेचा चाळीस लाख रुपयांचा धनादेश मयत पांडुरंग कदम यांच्या वारसदार पत्नी शिला पांडुरंग कदम यांना १० जून २०२६ रोजी परतूर येथील 'एसबीआय' मुख्य शाखेत मुख्य शाखा व्यवस्थापकांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कुटुंबाचा मुख्य आधार हरपलेल्या कदम कुटुंबाला या कठीण काळात बँकेच्या दोन हजार रुपयांच्या पॉलिसीमुळे चाळीस लाख रुपयांचे मोठे आर्थिक छत्र लाभले आहे. या विमा रक्कम धनादेश वितरणप्रसंगी बँकेचे शाखा प्रबंधक विजय राम, उपप्रबंधक हर्षवर्धन मुन, संध्या रसाळ, प्रज्वल सावंत, योगेश धानुरे, आकाश राजनकर...

मान्सून पूर्वतयारीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज,मोती तलाव येथे आपत्कालीन शोध व बचाव साहित्याची रंगीत तालीम संपन्न

Image
जालना प्रतिनिधी  नरेश आणा श्रीपती    आगामी मान्सून कालावधीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य आपत्कालीन परिस्थितीला तात्काळ व प्रभावी प्रतिसाद देता यावा, तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम व सज्ज राहावी यासाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आशिमा मित्तल यांच्या निर्देशानुसार व जालना शहर महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा, निवासी उपजिल्‍हाधिकारी तथा मुख्‍य कार्यकारी अधिकारी, जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण शशिकांत हदगल यांच्या मार्गदर्शनाखाली जालना शहरातील मोती तलाव येथील विसर्जन कुंड परिसरात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग व अग्निशमन विभाग, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्कालीन शोध व बचाव साहित्याची भव्य रंगीत तालीम आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारीआशिमा मित्तल, मनपा आयुक्त अंजली शर्मा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी दिपक काजळकर तसेच अग्निशमन अधिकारी संदीप दराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.  याशिवाय अग्निशमन विभाग, जालना, बदनापूर व अंबड येथील अधिकारी व कर्मचारी, तसेच रायगड येथे प्रशिक्षण पूर्ण करू...

बोव्हाईन ब्रिडींग ॲक्टची प्रभावी अंमलबजावणी करा : आयुक्त पशुसंवर्धन यांचे निर्देश

जालना प्रतिनिधी नरेश आणा श्रीपती  राज्यातील गाई-म्हशींच्या जातींमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी व प्रजनन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने “महाराष्ट्र गोजातीय प्रजनन (विनियमन) अधिनियम, 2023” लागू केला असून, या अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.) यांनी अधिनस्त अधिकारी वर्गाला दिले आहेत. राज्यात या कायद्याची अंमलबजावणी दि. 5 डिसेंबर, 2024 पासून सुरू झाली आहे. कृत्रिम रेतन प्रक्रियेद्वारे उत्तम दर्जाच्या व उच्च वंशावळीच्या वळूंचा वापर करून दुधाळ जनावरांची पैदास वाढविणे तसेच प्रजनन प्रक्रियेत होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालणे हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. या अधिनियमांतर्गत राज्यातील सर्व रेत केंद्रे, भ्रूण प्रत्यारोपण केंद्रे, कृत्रिम रेतन प्रशिक्षण संस्था व सेवा पुरवठादारांना महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरणाकडे नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. संबंधित संस्थांना केवळ प्रमाणित व उच्च वंशावळीच्या वळूंचेच रेत प्रजननासाठी वापरण्याची परवानगी राहणार आहे. या सर्व प्रक्रियांवर देखरेख ठेवण्यासाठी ‘महाराष...