Posts

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्,राज्य सरकारची याचिका सुप्रिम कोर्टानं फेटाळली

मुंबई:  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण (OBC reservation) रद्द ठरवले आहे. यासंदर्भातील ठाकरे सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालायने फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे ग्रामपंचायत, जिल्हापरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना मिळणार राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. हा ठाकरे सरकारसाठी मोठा झटका असल्याचे मानले जात आहे. (OBC reservation in local bodies cancels by Supreme cout) ओबीसींना 27 टक्क्यांच्यावर आरक्षण देऊ नका. 27 टक्के आरक्षणानुसारच जिल्हा परिषदेच्या निवडणुका घ्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. या निर्णयाला ठाकरे सरकारने आव्हान दिलं होतं. मात्र आता ठाकरे सरकारची ही याचिका फेटाळून लावली आहे. Special Story: ओबीसींची जनगणना भारतीय राजकारणाची कूस बदलणार?; वाचा स्पेशल रिपोर्ट! काय आहे प्रकरण? आरक्षणाची टक्केवारी 50 टक्क्यांवर असल्याप्रकरणी नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. दरम्यान तत्कालीन फडणवीस सरकारने नागपूरसह अकोला, वाशिम, नंदूरबार व धुळे जिल्हा परिषदांना मुदतवाढी दिली. द...

CAAसदर्भात अधीसुचना जारी नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून वाद असताना आता केंद्रीय गृहमंत्रालयाने नवीन अधिसूचना जारी केली आहे.

नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून (CAA) वाद असताना आता केंद्रीय गृहमंत्रालयाने (Ministry of home affairs) नवीन अधिसूचना जारी केली आहे. यानुसार आता अफगाणिस्तान, बांग्लादेश आणि पाकिस्तानातून आलेल्या बिगर मुस्लिम शरणार्थींकडून भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अधिसूचनेत गुजरात, राजस्थान, छत्तीसगढ, हरयाणा आणि पंजाबमधील 13 जिल्ह्यात राहणाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. यात हिंदू, शीख, जैन, बौद्ध यांसारख्या बिगर मुस्लिम नागरिकांना नागरिकत्वासाठी अर्ज करता येईळ असं सांगण्यात आलं आहे. अद्याप नव्या सीएए कायद्यांतर्गत नियम तयार नाहीत. सीएए कायद्याच्या माध्यमातून मोदी सरकारने अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चनांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद केली होती. मात्र अजुन याचे नियम तयार झालेले नाहीत. त्यामुळे नागरिकत्वासाठी आधीपासून असलेल्या नियमांतर्गतच नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने नागरिकत्व कायद्या 1955 आणि 2009 मध्ये तयार केलेल्या कायद्यांतर्गत नियमानुसार आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी अधिसूचना जार...

शिवराज जी नारियलवाले जालना यांच्या बाबत मुख्यमंत्री,गृहमंत्री यांना तहसील परतुर च्या मार्फत भाजपा युवा मोर्चा परतूर च्या वतीने बबनराव लोणीकर साहेब व राहुल भैया लोणीकर यांच्या सुचणे वरून निवेदन देण्यात आले

Image
परतूर (प्रतीनीधी) पोलिसां कडून सूडबुद्धीने अमानुषपणे करण्यात आलेल्या लाठीचार्ज चा तीव्र शब्दांमध्ये भाजपा युवा मोर्चा परतुर च्या वतीने जाहीर निषेध करत,दोषी पोलीस अधिकाऱ्यावर तात्काळ  कारवाई करण्यात यावी,नसता युवा मोर्चा तीव्र आंदोलन करेल,आसा आशयाचे निवेदन परतूर येथे तहसीलदार रूपा चित्राक यांना देण्यात आले निवेदना पूढे सांगण्यात आले कि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून आजपर्यंत महिला तरुण संत महंत यांच्यासह अनेकांना हा माणूस मारहाण झाल्याचं स्पष्ट झाला आहे हे सरकार महाराष्ट्राचा सरकार आहे की रजाकारी प्रवृत्तीच सरकार आहे हाच खरा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे या महाराष्ट्रात मागील दोन वर्षात पोलिसांना देखील मारहाण झाली परंतु त्यावेळी काही विशिष्ट लोकांचा समुदाय समोर होता म्हणून की काय पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली नाही परंतु भाजपा युवा मोर्चा चा पदाधिकारी याने एखाद्या चुकीच्या बाबी विरोधात आवाज उठवला म्हणून पोलिसांनी भाजपा युवा मोर्चाचे जालना जिल्हा सरचिटणीस शिवराज पहिलवान नारियलवाले या युवकाला अमानुष मारहाण केली आहे या माणूस मारहाणीचा भाजपा युवा ...

नारियलवाले मारहाण प्रकरणातील पोलीस निलंबित करा -- काकडे

Image
मंठा(प्रतीनीधी) जालना शहरामध्ये पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन व पोलीस कर्मचाऱ्यांची गुंडगिरी दिनांक 27 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्राने बघितली आहे. शिवराज नारियलवाले या भाजपाच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी लाठ्या-काठ्या तुटेपर्यंत बेदम मारहाण केली होती. या घटनेचा आपण महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने निषेधही व्यक्त केला. भविष्यामध्ये पोलिसांची दादागिरी ही सर्वसामान्य लोकावर दिसून येऊ नये. म्हणून या गोष्टीला आवर घालण्यासाठी पोलिसांची वाढलेली गुंडगिरी थांबवण्यासाठी आपण महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना निवेदन देऊन या घटनेतील संबंधित पोलिस अधिकारी कर्मचारी यांना तातडीने निलंबित करून त्यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी आपण केली असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धेश्वर काकडे यांनी माहिती दिली आहे. कार्यकर्ता कुठल्याही पक्षाचा असो, हि झालेली अमानुष मारहाण व तो बघितलेला व्हिडिओ कोणताही मनुष्य सहन करणार नाही. इतक्या विचित्र पद्धतीने मारहाण करण्याचे आदेश कोणाचे होते? हे सुद्धा तपास...

आंबेडकर नगरात घराघरात साजरी झाली तथागत गौतम बुद्ध जयंती !

Image
lपरतूर,दि.26 (प्रतिनिधी) -विश्वशांतीदुत तथागत गौतम बुद्ध  यांची २५८३  वी जयंती बुधवारी (दि.(२६ )  शहरात मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता घराघरात मनोभावे व शांततेने  बुद्धवंदना घेऊन विश्वशांतीदुताला अभिवादन करण्यात आले.       शहरातील डॉ. आंबेडकरनगरात कोरोना नियमांचे पालन करत घरातच जयंती साजरी करण्यात आली.    यावेळी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार यांनी आपल्या कुटुंबासमवेत तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामुदायिक वंदना घेतली. दीपप्रज्वलन करून अभिवादन केले. यावेळी पाडेवार म्हणाले की,सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना महामारीने थैमान घातले आहे.राज्यात कोरोनाचा वाढता प्रभाव व कोरोनामुळे मृत्युमुखी पडणारांची संख्या पाहता शासनाने काही नियम घालून दिले आहेत.अनुयायांनी शासनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.शासनाच्या निर्देशांचे पालन करत तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त सर्व आंबेडकरी अनुयायांनी रस्त्यावर गर्दी न करता आपआपल्या गावातील  बौद्ध विहारात मोजक...

परतूर येथे वीज कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती ती लावून काम बंद आंदोलन

Image
परतूर(प्रतीनीधी) फ्रन्टलाइन वर्कर घोषित करा या कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागणी करिता परतूर येथील महावितरण कर्मचारी अभियंता संघटना संयुक्त कृती समिती च्या वतीने उपविभाग कार्यालयाचे गेटवर काळ्या फिती लावून काम बंद आंदोलन करण्यात आले वीज कर्मचारी यांना राज्य शासनाने फ्रन्टलाइन वर्कर चा दर्जा देण्यात यावा कर्मचारी व त्यांच्या परिवाराचे प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे, कोरोना महामारीत मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचे वारसांना 50 लाख रुपये अनुदान देण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत या प्रसंगी वीज कर्मचारी अभियंता संघटनेचे पदाधिकारी एन व्ही बेंडाळे, रमेश आढाव, जी ए चंदेल, एम  ए रामटेके, मोरखडे, सय्यद नौशाद, सोहेल, जाधव, नदीम , होंडे, एन बी सोमलकर , के पी कुलकर्णी ईत्यादि कर्मचारी उपस्थित होते.

मुजमुले अँग्रो सर्व्हिसेसचे उदघाटन

Image
.............. परतूर /प्रतिनिधी परतूर शहरातील मुजमुले अँग्रो  सर्व्हिसेस & सोल्युशन  चे शुक्रवारी ता.21 रोजी  उदघाटन सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे व कृषि अधिकारी सखाराम पोळ याच्या हस्ते करण्यात आले यावेळी.मंडळ आधिकारी आकाश माने, नगरसेवक जगन्नाथ बागल, सिदार्थ बंड,द.या.काटे,ऍड विशाल बागल, शबीर ,सतीश चव्हाण,सुधाकर गिरी,राजेश पवार,मुकुंद खरात, रवी बागल,ओंकार माने,दिपक उबाळे,  योगेश बरीदे,अजय देसाई,सय्यद वाजेद ,मुन्ना चितोडा,आशिष गारकर , प्रमोद जईद, सह परीसरातील नागरिक व शेतकरी उपस्थित होते चौकोट... तरुण युवा पिढी ने  नोकरी च्या मागे न लागता व्यवसायात   उतरावे उत्पादन करून वेगळी ओळख निर्माण करावी, रवींद्र ठाकरे,सहाय्यक पोलीस निरीक्षक चौकोट.... वाढती बेरोजगारी बघता तरुण वर्गाने  जमेल तो व्यवसाय करून घराला हातभार लावावा.चांगलं उत्पादन घ्यावे. योगेश बरीदे,पत्रकार