Posts

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याचे मुख्य सूत्रधार अजूनही मोकाटच फिरत आहेत,त्यांना कधी पकडणार-जिल्हा उपाध्यक्ष कल्याण बागल

Image
परतूर (प्रतीनीधी) डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आठ वर्षे पूर्ण झाली आहे सीबीआयने त्यांच्या मारेकऱ्यांवर आरोपपत्र दाखल केले आहे मात्र,मुख्य सूत्रधार अजूनही मोकाटच फिरत आहेत. त्यांना कधी पकडणार,असा सवाल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे  जालना जिल्हा उपाध्यक्ष कल्याण बागल यांनी केला.   महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा परतुरच्या वतीने डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त डॉ.नरेंद्र दाभोलकर  हत्येच्या मुख्य सुत्रधारांना पकडण्यात यावे याकरिता उपविभागीय कार्यालय परतूर येथे निवेदन देण्यात आले होते याप्रसंगी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जालना जिल्हा उपाध्यक्ष कल्याण बागल बोलत होते याप्रसंगी  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे परतूर तालुका अध्यक्ष एकनाथ कदम,जिल्हा प्रधान सचिव रमाकांत बरीदे,संभाजी तांगडे,दिलीप अण्णा मगर,सुनील खरात,अश्विन गुंजकर,लक्ष्मीकांत माने,देशमुख के.एन.,संतोष रनबावळे यांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना कल्याण बागल म्हटले की,विज्ञानवादी समाजसुधारक डॉ.दाभोलकर,कॉ.गोविंद पानसरे, प्रा.कलबुर्गी आणि गौरी...

खरीप हंगाम संपत आलाय तरी बँकेतून शेतकर्‍यांना पीक कर्ज मिळेना,परतूरच्या स्टेट बँकेची शेतकर्‍यांना उडवाउडवी,बँकेतील कर्मचारी व गार्ड करतात शेतकर्‍यांना आरेरावीची भाषा**पीककर्जाचे प्रकरने तात्काळ निकाली काढा अन्यथा गाठ शिवसेनेशी- शहर प्रमुख दत्ता पाटील

Image
परतूर(प्रतिनिधी) चालु वर्षीचा खरीप हंगाम संपत आलाय तरी परतूर परिसरातील शेतकर्‍यांना अजुन स्टेट बँकत पीककर्जासाठी चकराच माराव्या लागत आहेत.कुठल्याना कुठल्या कारणावरून कर्मचारी कामचुकार पणा तसेच पीककर्जासाठी चालढकल करतांना दिसत आहेत.आॅगस्ट महिण्याची 10 तारीख उजडली तरी शेतकर्‍यांना पीककर्ज काही वाटप होतांना दिसत नाही किंवा अत्यंत संथ गतीने वाटप होत असून पिक कर्ज वाटपामध्ये अनियमीतता होत असल्याचा आरोप शिवसेना शहर प्रमुख दत्ता पाटील सुरूंग यांनी स्टेट बँकेच्या विभागिय कार्यालयाला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे.  निवेदनात प्रामुख्याने म्हटले आहे की शेतकऱ्यांचा खरीप हंगाम चालु होऊन बरासा कालावधी उलटला तरी बँक काही ना काही कारणाने शेतकर्‍यांना पीककर्जासाठी वेठीस धरत आहे. पेरणीसाठी शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता असतांना परतूरच्या भारतीय स्टेट बँक  मधून गेल्या दोन महिन्यापासून शेतकऱ्यांना वेळेवर पिक कर्ज मिळक नाही . त्यामुळे शेतकरी हवालदील झाला असून परतूर शाखेमध्ये शेतकरी हा दोन - दोन महिन्यापासून शेतीची कामे सोडुन बँकेत चकरा मारीत आहे . त्यांना पिक कर्ज मिळकत नाही व काही...

जाहिरातबाजीवर १६० कोटींची खैरात, कर्जबाजारी शेतकरी वाऱ्यावर! - भाजपा नेते माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची ठाकरे सरकारवर टीका,राज्यसरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पिक विमा कंपनी "मालक" झाली त्यामुळे यावर्षी पीकविमा मिळणारच नाही ! -लोणीकर

Image
परतूर (प्रतिनिधी ) केवळ शब्दांची आतषबाजी करणाऱ्या ठाकरे सरकारने शेतकऱ्यांच्या फसवणुकीत आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. अतिवृष्टी, वादळांसारख्या संकटात अगोदरच भरडलेल्या शेतकऱ्यास मदतीचा हात देण्याऐवजी स्वतःच्या जाहिरातबाजीवरच एकशे साठ कोटींची उधळपट्टी करून ठाकरे सरकारने शेतकऱ्यास उद्ध्वस्त केले आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे नेते माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. महाविकास आघाडी सरकारने मोठ्या थाटात राज्यातील संकटग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची गर्जना विधिमंडळात केली, त्याला दीड वर्ष उलटून गेल्यानंतरही शेतकऱ्याच्या पदरात कर्जमाफी पडलेलीच नाही. खोट्या जाहिरातींवर एकशे साठ कोटींची उधळपट्टी करण्याऐवजी १५० कोटी रुपये कर्जमाफीसाठी दिले असते, तर संकटग्रस्त शेतकऱ्यास दिलासा मिळाला असता. राज्यातील शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन कर्जमुक्त करण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली होती. प्रत्यक्षात मात्र वीज दरवाढीचे धक्के देऊन शेतकऱ्यास वेठीस धरले जात आहे, पीकविम्याबाबतही विमा कंपन्यांशी साटेलोटे करून शेतकऱ्याची फसवणूक केली जात आहे, असा आरोप ...

परतूर शहराच्या विकासासाठी ५ कोटी निधी द्या - मोहन अग्रवाल यांची नगरविकास मंञ्याकडे मागणी

Image
परतूर /प्रतिनिधी शिवसेनेचे जिल्हा संघटक तथा परतुर नगरपालिकेचे विरोधी पक्ष गटनेते मोहन अग्रवाल यांनी शिवसेना नेते तथा माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली परतुर शहराच्या विकास कामासाठी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शहराच्या विकासासाठी ५ कोटी रुपये निधी मंजूर करा, अशी मागणी निवेदनाद्वारे मंत्रालयात जाऊन प्रत्यक्षात नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून केलीआहे. परतुर शहराचा रखडलेला विकास पाहता शहरातील विविध भागात विकासकामा अभावी नागरिकां  बेहाल होत असून शहरातील  भुयार गटार योजनेमुळे गल्लोगलीत फुटलेले रस्ते स्वच्छतेचा आभाव व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या नंतर शिवसेनेचे मोहन अग्रवाल यांनी  नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन  शहर विकास कामासाठी 5 कोटी रुपयाचा निधी मंजूर करावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी शिवसेना नेते तथा माजी मंत्री अर्जुनराव खोतकर व उपजिल्हाप्रमुख पंडितराव भूतेकर यांची उपस्थिती होती.

परतूर शहरात स्वच्छता मोहीम राबवावी - अर्जुन पाडेवार यांची मागणी

Image
परतूर,दि.१(प्रतिनिधी) - शहरात साथरोग पसरू नये यासाठी नगरपालिकेच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात यावे तसेच नालेसफाई, जंतुनाशक औषध फवारणी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार यांनी एका निवेदनाद्वारे नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.     यासंदर्भात पाडेवार यांनी पालिकेच्या मुख्याधिका-र्यांना दिलेली निवेदनात म्हटले आहे की, शहरात घाणीचे प्रमाण वाढल्याचे दिसते.सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने शहरात साथीचे रोग झपाट्याने पसरू शकतात.सध्या शहराच्या अनेक भागात नाल्याचे पाणी रस्त्यावरून वाहताना दिसते.त्यामुळे दुर्गंधी देखील पसरते.रोगराई पसरू नये म्हणून शहरात जंतुनाशक औषधींची फवारणी करावी.तसेच शहरात तातडीने स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी जेणे करून रोगराईचा प्रसार होणार नाही आणि नागरिकांचे आरोग्य अबाधित राहील असे या निवेदनात म्हटले आहे. ------------------------   शहर परिसरात डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण सापडण्याअगोदरच नगरपालिकांनी याची काळजी घेतली तर साथरोग वेळीच आटोक्यात येईल त्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करावी त...

अतिवृष्टीग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करा - माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी,शासनाच्या आदेशाची वाट न पाहता आपत्ती व्यवस्थापननुसार अतिवृष्टीग्रस्त भागाचे पंचनामे करा मदत द्यायची किंवा नाही ते सरकार ठरवेल - माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासनाला सूचना

Image
परतूर(प्रतिनिधी) मागील आठ ते दहा दिवसांपासून मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असून पावसामुळे नुकतीच पेरणी करण्यात आलेले सोयाबीन सह इतर पिके पिवळी पडत असून शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे अगोदरच शेतकरी संकटात असताना पुन्हा अस्मानी संकटाने देखील शेतकऱ्यांवर खूप मोठा आघात केला आहे अशा परिस्थितीत अतिवृष्टीग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्यात यावी अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे अतिवृष्टी गारपीट ढगफुटी भूकंप यासारखी नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास सरकारने सजग राहून तात्काळ पंचनामे करणे बाबत आदेशित करणे आवश्यक आहे परंतु महा विकास आघाडी सरकारने अद्याप कोणत्याही प्रकारचे पंचनामे करण्यासंदर्भात आदेश दिले नाहीत त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला महाविकास आघाडी सरकार काहीही करत नाही ही बाब भाजपा किसान मोर्चाच्या शिष्टमंडळाने माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या निदर्शनास आणून दिली त्यावेळी आपत्ती व्यवस्थापनानुसार शासनाच्या आदेशाची वाट न पाहता जिल्हाधिकारी स्तरावर संब...

गाव तिथं शाखा आणि घर तेथे शिवसैनिक तयार करा - जिल्हाप्रमुख बोराडे

Image
परतूर /प्रतिनिधी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री  उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून शिवसंपर्क आभियान मोहीम दि.१२ जुलै ते २४ जुलै दरम्यान राबवण्यात येत   असून परतूर शहरातील डाँ.आण्णाभाउ साठे नगर येथे शिवसंपर्क अभियान अंतर्गत परिसरातील शिवसैनिक व नागरीकांशी बैठकीद्वारे संवांद साधण्यात आला. यात जिल्हाप्रमुख बोराडे यांनी सांगितले की , मुख्यमंत्री यांच्या आदेशाने गाव तिथे शाखा व घर तेथे शिवसैनिक तयार झालाच पाहिजे येणाऱ्या काळात नगरपालिका निवडणुका होत आहेत यासाठी बुथ बांधणी पासून शिवसेना पदाधिकाऱ्यांनी  तयारी केली पाहिजे तसेच शहरातील संपूर्ण शाखा तयार केल्या पाहिजेत.शिवसेना पक्ष प्रमुख व महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या लोकहिताचे महत्त्वपूर्ण निर्णय समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचण्यासाठीही आव्हान याप्रसंगी बोराडे यांनी केले. या आव्हानास शिवसैनिकांनी व नागरीकांनी  उत्तम प्रतिसाद दिला.यावेळी जालना जिल्हा प्रमुख ए. जे. बोराडे, जिल्हा संघटक मोहन अग्रवाल, जिल्हाउपप्रमुख बाबाजी तेलगड ,तालुका प्रमुख अशोकराव आघाव,...