Posts

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

परतूर रेल्वेस्टेशन परिसरात वृक्षारोपण

Image
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे  - रेल्वे कर्मचारी व लॉयन्स क्लबच्या वतीने रेल्वेस्टेशन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.       येथील स्थानिक रेल्वे विभाग व लॉयन्स क्लबच्या वतीने सोमवारी रेल्वेस्टेशन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी लॉयन्स क्लबचे अध्यक्ष डॉ.संदीप चव्हाण,डॉ. नंद, स्टेशन प्रबंधक अमरदीप,पत्रकार राजकुमार भारुका,आरपीएफचे राजमल्ली, मेघराज पाटील, राजेश उबाळे, सुमित खालापूरे प्रा भोसलेसर गजानन तागडे शंकरसेठ अग्रवाल अशोक ठोके आदींची उपस्थिती होती. यावेळी डॉ. संदीप चव्हाण यांनी म्हटले की, वृषारोपन ही काळाची गरज असून झाडे जगली तरच पर्यावरण टिकेल पर्यावरणच संतुलित जीवन आहे याची जाणीव सर्वांनी आत्मसाथ करणे ही काळाची गरज असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी रेल्वेस्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली.

सामाजिक उपक्रमाने युवामोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांचा वाढदिवस साजरा - जिल्हा सरचिटणीस संपत टकले यांच्या पुढाकाराने सामाजिक उपक्रम

Image
परतूर – प्रतिनिधी हनुमंत दवंडे  परतूर येथील माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चा  प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या सूचनेवरून जालना जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाकडुन जालना जिल्हा संघटन सरचिटणीस संपत टकले यांनी युवामोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त परतूर येथील स्नेहांकुर सामाजिक प्रकल्पा मधील अनाथ मुलांना मंगळवारी एक दिवसाचे पालकत्त्व स्वीकारून स्नेहांकुर प्रकल्प परिसरात वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. तसेच वाढदिवसानिमित्त  सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.     यावेळी जिल्हा सरचिटणीस संपत टकले, भाजपा तालुकाध्यक्ष रमेश भापकर, युवा मोर्च्याचे तालुकाध्यक्ष छत्रगुण कणसे, प्रवीण सातोनकर, रामेश्वर तनपुरे, प्रमोद राठोड, सुनील शिवनगिरीकर, नरेश कांबळे, शिवाजी पाईकराव, शामसुंदर चित्तोडा, अमोल पैठणकर, सागर राठोड, रवी मानवतकर, शुभम कटोरे, लक्ष्मण बिल्हारे, प्रदीप कातारे,  नीता क...

दैनंदिन जीवनाशी गणिताचा संबंध जोडल्यास गणित विषय सोपा- डॉ. प्रज्ञानकुमार भोजनकर ,आनंद विद्यालयात संपन्न झाली गणित विषयाची कार्यशाळा

Image
प्रतिनिधी / परतूर हनुमंत दवंडे :         दैनंदिन जीवनात सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत अनेक घटनांच्या माध्यमातून गणिताचा संबंध आलेला आपल्याला पाहायला मिळते.गाणितातील आकडेमोडीची भीती मनात न बाळगता, गणिताशी बोला, त्याच्याशी मैत्री करा, गणित तुम्हाला आपलेले करील असे मत महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे सदस्य डॉ. प्रज्ञानकुमार भोजनकर यांनी व्यक्त केले आहे. येथील आनंद माध्यमिक विद्यालयात गणित विषयासंदर्भात विशेष कार्यशाळेचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. गणित विषयाची विद्यार्थ्याना वाटणारी भीती आणि त्यावरील उपाययोजना या विषयावर मार्गदर्शन करतांना डॉ. भोजनकर बोलत होते. यावेळी शिवछत्रपती शिक्षण व क्रीडा मंडळाचे अध्यक्ष एकनाथ कदम, मुख्याध्यापिका सत्याशिला तौर-कदम यांची प्रमुख उपस्थिती होती गणित विषय विद्यार्थ्यांच्या विचारशक्तिला चालना देणारा, बौद्धिक विकासाला प्रोत्साहन देणारा विषय आहे. गणितात अनेक गमतीशीर बाबी समजून घेतल्यास विषय कंटाळवाणा न होता गमतीशीर होऊ शकतो. गणितातबाबतचा न्यूनगंड बाजूला ठेवून नवीन गोष्टी आत्मसात करण्यासाठी ...

श्री नेमिनाथ महाराज संस्थान येथे एकादशी निमित वृक्ष रोपन व फराळाचे वाटप

Image
तळणी : प्रतिनिधी रवी पाटील  कृष्णगंगा फार्मर प्रोडूसर कंपनी द्वारे श्री नेमिनाथ महाराज संस्थान येथे एकादशी निमित्ताने वृक्षारोपण व फराळाचे वाटप करण्यात आले यावेळी ह.भ.प. विष्णु महाराज बादाड ह भ पअर्जुन महाराज बादाड अध्यक्ष्य किशोर भाऊ खंदारे   गोविंदराव खंदारे गणेश राव कापकर प्रभूसिंग चव्हाण सरपंच बबनराव खंदारे रामप्रसाद खंदारे कृष्णा खंदारे वसंत पवार रवी खंदारे आदीची उपस्थीती होती        यावेळी मनोगत व्यक्त करते वेळी विष्णु महाराज बादाड यानी वृक्षसंगोपणाचे फायदे उपस्थीताना पटवून दीले जास्तीत जास्त ऑक्सीजन देणारे झाडे लागल्या गेली पाहीजेत आँक्सीजनचे काय महत्व आहे हे आपण कोरोना काळात अनुभवले आले वृक्ष लागवड ही एक लोक चळवळ झाली पाहीजे फक्त फोटो काढण्यापूरतीची वृक्ष लागवड उपयोगाची नाही लावलेल्या वृक्षाचे संगोपन होने ही काळाची गरज असुन प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावृन त्याचे संगोपन करावे  असे आवाहन बादाड महाराज यांनी केले तसेच यावेळी किशोर खंदारे यानीही मनोगत व्यक्त केले वृक्षसवर्धन व त्याचे संगोपन करण्यासाठी स्पर्धा होणे ग...

प्रहारच्या मागणीला यश-अशोक तनपुरे

Image
परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे  परतुर येथे ग्रामीण रुग्णालय येथे प्रहार संघटनेच्या वतीने विविध निवेदन आंदोलन केले परतूर येथे ग्रामीण रुग्णालयात अपंगासाठी प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्यात यावी याकरिता दोन वर्षापासून संघर्ष चालू होता तरी या मागणीला प्रतिसाद देत ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधीक्षक डॉ. ज्ञानदेव नवल  यांनी अपंग तपासणी व प्रमाणपत्र या मागणीचा प्रस्ताव जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे पाठविला तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी परतूर येथे दुसरा शनिवार व चौथा शनिवार अपंग प्रमाणपत्र देण्यासाठी अपंग तपासणी व प्रमाणपत्र मान्यता दिली यामध्ये अस्थिव्यंग व अल्पदृष्टी या तपासणीला मान्यता दिली यामुळे तालुक्यातील अपंग बांधवांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही यामुळे अपंग बांधवांचे जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याकरता मोठे आर्थिक व वेळही जाणार नाही याबद्दल अशोक तनपुरे यांनी ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधीक्षक डॉ ज्ञानदेव नवल  तसेच जिल्हा रुग्णालयाचे तज्ञ डॉ भगत  यांचे आभार मानले

अमित ठाकरे यांचा मराठवाड़ा दौरा - सिद्धेश्वर काकडे

Image
मराठवाडा: प्रतिनिधी समाधान खरात   महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष राजपूत्र श्री.अमित ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हातामध्ये घेतल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेसह विद्यार्थी सेनेची मोठी चळवळ उभा राहतांना दिसून येत आहे.      महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित साहेब ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत शेवटच्या घटकापर्यंत जाऊन सर्वसामान्य कार्यकर्त्याला जोडून महाराष्ट्रातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना मजबूत करतांना दिसत असल्याने याचा खूप मोठा आनंद असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी सेनेचे सिध्देश्वर काकडे यांनी म्हंटले आहे. दिनांक १६ जुलैपासुन त्यांचा मराठवाडा दौरा चालु होणार आसुन अमित साहेब ठाकरे हे मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन विद्यार्थी व तरुणांशी भेटून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत अशी माहिती मनसे विद्यार्थी सेनेचे सिद्धेश्वर काकडे यांनी दिली आहे.

ब्राईट स्टार इंग्लिश स्कूलमध्ये अवतरले पंढरपूर..

Image
  परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे दि.9 जुलै 2022 रोजी परतुर येथील ब्राईट स्टार इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशीनिमित्त नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनियर केजी ,ते पाचवी पर्यंतच्या मुलांनी वारकऱ्यांच्या वेशभूषा मध्ये सहभाग घेऊन वारकरी संप्रदायाची परंपरा नेटाने पुढे नेण्याचा प्रयत्न केला . विठ्ठल रुक्मिणी चे लोभस व गोड रुप, इवल्याशा हातात टाळ घेऊन हरिनामाचा जप करत छोटे वारकरी सजुन धजुन आले होते. कुणी डोक्यावर तुळस घेतली होती तर कुणी हातात भगवा झेंडा घेतलेला… आषाढी एकादशीनिमित्त आयोजित वारी या उपक्रमाचे. दिलेल्या सुचने प्रमाणे सर्व विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा अतिशय सुंदर अशी केली होती. ढोल, ताशांच्या गजरात शाळेतून वारी निघाली. टाळ वाजवत, हरिनामाचा जप करत वारी निघाली. विठ्ठल रुक्मिणी ची वेशभूषेतील विद्यार्थी पुढे तर चोपदार सोबत, मागे बाल गोपाळांची वारी. अतिशय रम्य असे दृश्य, चिमुकल्यांची वारी पाहुन शहरातील नागरिकांनी कौतुकाने वारीचे स्वागत केले. सगळीकडे भक्तिमय वातावरण तयार झाले. .यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. खणके सर व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते .हा कार्य...