Posts

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

देशात २२ जानेवारीला रामराज्य स्थापन होईल- ह.भ.प.रुपालीताई सवने

Image
प्रतीनीधी समाधान खरात भोकरदन - देशातील तरुणांनी प्रभू श्रीरामांचा आदर्श घ्यावा. देशाने आपल्यासाठी काय केले हा विचार केल्यापेक्षा आपण देशासाठी काय करू शकतो, हा विचार तरुणांनी करावा. तसेच २२ जानेवारीला अयोध्येत भव्य राम मंदिरात रामलल्लांची मूर्ती स्थापन होत आहे. त्या दिवसापासून देशात रामराज्य स्थापन होईल, असे प्रतिपादन ह.भ.प. रुपालीताई सवने यांनी केले.  भोकरदन शहरात स्व.भिकनराव श्रीनिवासराव देशमुख यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त लक्ष्मणराव देशमुख, राम देशमुख यांच्या वतीने ह.भ.प.रुपालीताई सवने परतुरकर यांचे किर्तणाचा कार्यक्रम घेण्यात आला. या किर्तनात विष्णु महाराज सास्ते,  गोरक्षनाथ महाराज, शंकर महाराज साबळे, सोमनाथ महाराज सहाने, दत्ता महाराज, नितीन महाराज, संतोष महाराज, साहेबराव बारोकर, प्रभाकर तळेकर  यांच्यासह नागेश्वर बाबा वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी त्यांना सहकार्य केले.  पुढे बोलतांना रुपालीताई सवने म्हणाल्या की, नव्या वर्षात 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लाची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात येणार आहे. 500 वर्षानंतर राममंदिर लोकार्पणाचा...

2020 मधील गुन्ह्या च्या आरोपीस राजस्थान येथुन अटक

जालना प्रतिनिधी समाधान खरात     सन 2020 मध्ये दाखल असलेल्या गुन्हाचे तपासात निष्पन्न झालेल्या आरोपीस अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो जालनाचे पथकाने राजस्थान येथे जाऊन पकडले आहे.  अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो जालना यांचेकडुन उघड चौकशी करून खालील नमुद आरोपीतांनी माहे 07/2011 ते 12/2013 या कालावधीत पंचायत समिती घनसावंगी जि जालना अंतर्गत कुं.पिंपळगाव शिवारातील मग्रारोहयो अंतर्गत विहीरींचे कामासंबंधी संगनमत करून खोटे व कपटाने प्रत्यक्षात न केलेल्या कामाची नोंद हजेरी पुस्तकात घेऊन बनावट व खोटी पुस्तके तयार करून वेळोवेळी रकमा मंजुर करुन घेतली वा शासनाचे 9,65,952 रूपयांचे नुकसान करून स्वत:चा व इतरांचा फायदा करून घेतला या वरुन दि. 21.07.2020 रोजी पोलीस ठाणे घनसावंगी जि.जालना गु र नं 271/2020 कलम 13(1)(क), सह 13(2) भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 सह कलम 420, 467, 468, 471, 114,109, 201, 34 IPC प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात  आरोपी नामे  1. शे.शकील मो खलील, तत्कालीन शाखा अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा, पं स घनसावंगी  2. धोंडीभाऊ भाऊराम काळे, तत्कालीन ग्रामसेवक कुं...

युवांनी अंनिसचे सभासद व्हावे-- डॉ. ठकसेन गोराणे

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात जालना -महाराष्ट्र अंनिसच्या जालना जिल्हा व शहर शाखांचे कार्यकर्ते ,पदाधिकारी यांची बैठक नुकतीच जालना रेल्वे स्टेशन रोडवरील आपुलकी बेघर निवारा केंद्रात संपन्न झाली. त्यावेळी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे म्हणाले की, संघटितपणे समाजातील अंधश्रद्धांचे निर्मूलन करणे आणि समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाची रुजवणूक करणे असे काम मागील ३५वर्षांपासून महाराष्ट्र अंनिस समाजात करीत आहे. त्याचबरोबर व्यक्तीचे व्यक्तिमत्व विवेकी घडण्यासाठीही या कृतिशील विचारांचा फार मोठा उपयोग होतो, म्हणून या कामांमध्ये युवा वर्गाने जाणिवपूर्वक सहभागी होण्यासाठी अंनिसचे सभासद व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे. पुढे ते म्हणाले की अंनिसचे सभासद होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. देवाधर्माच्या नावाने होणारे शोषण, फसवणूक व दिशाभूल याला अंनिस विरोध करते, म्हणून या विचारांचा स्वतःबरोबरच कुटुंबाला आणि समाजालाही मोठा उपयोग होतो.     या बैठकीत संघटनात्मक व उपक्रमात्मक कामाबद्दल चर्चा हो...

गोर सेनेचा वाटूर फाट्यावर रास्ता रोको, दोन तास वाहतूक ठप्प : विमुक्त जातीतील घुसखोरी थांबविण्याची मागणी

Image
परतूर प्रतिनिधी कैलास चव्हाण    परतूर - विमुक्त जाती अ' प्रवर्गातील इतर जातीची घुसखोरी थांबविण्यात यावी, बनावट जात प्रमाणपत्राबाबत विशेष तपासणी पथकाची स्थापना करण्यात यावी, या इतर मागण्यांसाठी गोर सेनेच्या वतीने गुरूवारी (दि. २८) जिल्हा- नांदेड महामार्गावरील वाटूर फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण, अविनाश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी बंजारा समाजातील महिला पारंपारिक वेशभूषा धारण करून या रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. विमुक्त जाती 'अ 'प्रवर्गात अवैध मार्गाने खोटे जात वैधता प्रमाणपत्र घेणाऱ्या लाभार्थ्यांसह खोटे प्रमाणपत्र वितरित करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष तपासणी पथक स्थापन करण्यात यावे, संपूर्ण महाराष्ट्रत जिल्हा ठिकाणी जिल्हा जात वैधता पडताळणी समितीम ध्ये वि.जा. (अ) प्रर्वगातील एका तज्ञ व्यक्तीची शासकीय प्रतिनिधी म्हणून नेमणूक करावी, २४ नॉव्हेबर २०१७ च्या महाराष्ट्र शास...

मुख्यधीकारी अभिषेक परदेशी यांच्या अव्हानाला प्रतिसाद,नागरीकांनी स्वःत हून काढले अतिक्रमण

Image
परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण     शहरातील न.प. परतूर येथील मुख्यधीकारी अभिषेक परदेशी यांनी मांगळवार रोजी नागरिकांना अतिक्रमण स्वःत काढून घेण्या करीता आवाहान केले होते  त्यांच्या आवाहानाला प्रतीसाद देत परतूर शहरातील नारारीकांनी स्वःत हून नाल्या वरील अतिक्रमण काढून घेतले व शहरातील आ.लोणीकर यांच्या माध्यमातून होणाऱ्या रस्त्याचे कामा संदर्भात समाधान व्यक्त केले व शहरातील मुख्य रस्त्या वरील दोन्ही बाजूने नाल्या व्हाव्या तसेच रस्त्यावरील लागणारे हातगाड्या साठी योग्य जागा द्यावी व त्यांनी रस्त्यावर हातगाडे लावू नये आशी अपेक्षा शहरातील नागरीकांनी व्यक्त केली आहे

राजेगाव येथुन तीन बैल चोरीला ,चोरीच्या घटनेने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण

Image
घनसावंगी -- प्रतिनिधी तालुक्यांतील राजेगावं शिवारात शेत गट क्र. सतरा मध्ये गोठ्यात बांधलेले तीन बैल चोरीला गेल्याची घटना मंगळवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आली. या घटनेने शेतकरी वर्गात चिंता व्यक्त केली जात आहे. शेतकरी सचिन सुरेश उगले यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की राजेगांव शिवारात शेत गट क्र. 17 मधील शेतामध्ये जनावराचा गोठा आहे. तिथे जनावरे नेहमी बांधतो दी 25 डिसेंबर 2023 रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारस  गोठ्यावर चक्कर मारुन घरी आले होतो. दि 26 रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास शेतामध्ये गेलो आसता गोठ्यात बांधलेल्या तीन बैल दिसुन आले नाही. बैलाच्या गळ्यातील घागरमाळ तुटुन खाली पडलेला दिसल्या  तीन बैलाचा आजुबाजुला शोध घेतला असता मिळुन आले नाही. कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी एक लाल रंगाचा, आणि दोन पाढ-या रंगाचे साठ हजार रुपये किमतीचे बैल कोणीतरी अज्ञात चोरट्याने शेतातील गोठ्यतून चोरुन घेऊन गेले आहे.      या प्रकरणी घनसावंगी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकों  वैराळ हे करीत आहेत. या घटनेने श...

मेन रोड वरील अतिक्रम स्वःता काढून घ्यावे -मुख्यधीकारी अभीषेक परदेशी

Image
 परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण  आज परतूर शहरात मेन रोडची नगर परिषद चे मुख्यधीकारी अभिषेक परदशी यांनी पाहानी केली यावेळी त्यांनी व्यापाऱ्या ना सुचना केल्या की जर कोणाचे अतिक्रमण असतील तर त्यांनी स्वःताहून काढून घ्यावे    परतूर शहरात मेन रोड राजू मुंदडा यांच्या पानपट्टी पासून पुढील रस्ता राहीलेला असून या राहीलेल्या रस्त्याची पाहनी केली व व्यापाऱ्याना सुचना केल्या की येत्या 29 की डींसेबर रोजी शहरातील या राहीलेल्या रस्त्याच्या कामाचे उद्घघाटन आमदार बबनराव लोणीकर हे करणार असून हया रस्त्यावर ज्यांचे अतिक्रमण असतील,रोड वर काही पाट्या असतील,काही साहित्य असतील तर ते तातडीने स्वतःहून काढून घ्यावे नसता न.प.अतीक्रमण काढेल व रस्त्यावरील साहित्य जप्त करील असे शेवटी सुचना देताना न.प. मुख्यधीकारी अभिषेक परदेशी यांनी दिल्या     यावेळी त्याच्या सोबत अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचारी तसेच फायरमन अनील पारीख, स्वच्छता निरीक्षक रवी देशपांडे,सुरेश अर्सुल ,आदी होते