Posts

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

बुध्दिमत्ता व कौशल्याचा वापर करुन नवनिर्मिता करा '- प्राचार्य तथा अध्यक्ष एकनाथ कदम .

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण    आनंद इंग्लिश स्कूल परतुर येथे विद्यार्थी प्रतिकृती प्रदर्शन संपन्न झाले. याचे उदघाटन रमाकांत बरीदे सर यांनी केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे ह.भ.प शेषनारायण महाराज इक्कर व संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य एकनाथ कदम उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटक रमाकांत बरीदे म्हणाले की,विद्यार्थांनी विज्ञानाचे प्रयोग ,नवनिर्मिती व शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. प्रदर्शनाच्या आयोजन बद्दल शिक्षक व पालक यांचे कौतुक केले. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना मा.एकनाथ कदम म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्या बुध्दिचा व कौशल्याचा वापर करुन नवनिर्मिती करावी व पालकांनी यासाठी सहकार्य करावे . या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सकस आहार, खडकांचे प्रकार, विविध सण उत्सव, वायूंची निर्मिती, इंग्रजी वाक्याची रचना व गणित विषयातील संकल्पना या विषयावर प्रतिकृती सादर केल्या. प्रदर्शन पाहण्या साठी पालक व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.  कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्राचार्य नारायण सागुते यांनी केले तर प्रास्तविक सत्यशीला तौर यांनी केले . कार्यक्रम यशस्वीते साठ...

परभणी लोकसभा मतदार संघातुन राहुल लोणीकर यांणा उमेदवारी देण्याची जनतेतुन मागणी वाढली

Image
परतुर प्रतिनिधि कैलास चव्हाण  युवा ह्रदय सम्राट म्हणून तरूणा मध्ये राहुल लोणीकर यांणा परभणी लोकसभा मतदार संघातुन उमेदवारी दिल्यास विरोधकांचे डिपाजिट जप्त होईल असी परभणी लोकसभा मतदार संघामध्ये चर्चा असुण लोणीकर यांणा माणनारा मोठा वर्ग असुण सोशल मीडिया वर राहुल लोणीकर यांणा उमेदवारी मिळावी या करिता मि मतदार माझा खासदार राहुल भैय्या असी पोस्ट मोठया प्रमाणात वायरल होत आहे          तरूण पिढी च्या वॉटसाप स्टेटस डिपी फेसबुक, टि्वटर टाकत आहे , राहुल लोणीकर यांचा फोटो सह विधमान आमदार बबनराव लोणीकर यांचा फोटो मोठया प्रमाणात वॉ टसाप ग्रुपवर मतदारा कडुण वायरल केला जात असुण राहुल लोणीकर सारखा तरूण होतकरू खासदार परभणी लोकसभा मधुण निवडुण गेल्यास परभणी लोकसभा मतदार संघाचा काया पलट झाल्या शिवाय राहणार नाही असे मत अनेक जाणकार बोलुण दाखवत आहे, या वेळेस परभणी लोकसभा निवडनुकी मध्ये राहुल भैय्या लोणीकर यांचा नावा मुळे परभणी लोकसभा मतदार संघामध्ये मध्ये भा,ज,पा ला अनूकूल वातावरण निर्माण झाले असुण वरिष्ठ पातळीवर याचा विचार झाल्यास या वेळेस परमणी मतदार संघातुन भा ज पा...

महाराजे मल्हारराव होळकर यांचे विचार आत्मसात करून समाज बांधवाने पुढे यावे- प्रकाश सोनसळे (अध्यक्ष धनगर समाज संघटना महाराष्ट्र राज्य)

Image
बीड प्रतीनिधी  बीड येथील नामलगाव फाटा या ठिकाणी राजे मल्हारराव होळकर यांची 331 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मल्हारराव होळकर यांचा इतिहास जागा करण्यासाठी धनगर समाज संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुढाकार घेऊन युवकांना प्रेरणा मिळेल असे काम मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज नामलगाव फाटा व घोसापुरी या गावांमध्ये मल्हारराव होळकर यांचा इतिहास जागा करण्यासाठी या गावातील युवकांनी पुढे येऊन पुढाकार घेतला.     मल्हारराव होळकरांचा इतिहास मोठा आहे हा इतिहास आपण सर्वांनी जागृत केला पाहिजे व गावोगावी मल्हारराव होळकर यांचे विचार आपण पोहोचले पाहिजे असे या ठिकाणी बोलताना मा.प्रकाश  सोनसळे अध्यक्ष धनगर समाज संघटना महाराष्ट्र राज्य यांनी समाज बांधवांशी बोलताना सांगितले.   बीड जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी मल्हारराव होळकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.   या वेळी उपस्थित धनगर समाज संघटनेचे अध्यक्ष. प्रकाश  सोनसळे, अमोल भोंडवे युवक तालुकाध्यक्ष धनगर समाज पाटोदा, घोसापुरी चे दबंग सरपंच फारूख भैय्या पटेल व उपसरपंच सुभाष जाधव...

राज्यस्तरीय विशेष आरोग्य मदत कक्षाच्या महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा समितीवर डॉ. स्वप्नील बी. मंत्री यांची महाराष्ट्र शासनाच्या वतीने नियुक्ती

Image
परतूर प्रतीनिधी( कैलाश चव्हाण) परतूर येथील सुप्रसिध्द बाल रोगतज्ञ डॉ. स्वप्नील बी. मंत्री ह्यांची राज्यस्तरीय विशेष आरोग्य मदत कक्षाच्या महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा समितीवर डॉ. स्वप्नील बी. मंत्री यांची महाराष्ट्र शासनाच्या वतीने नियुक्ती करण्यात आली आहे. ह्या संबंधीचे शासन पत्र 14 मार्च 2024 रोजी जारी करण्यात आले. ही नियुक्ती केल्याबद्दल डॉ. मंत्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्र भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन, खा. डॉ अजित गोपछडे, आ. बबनराव लोणीकर, राज्यस्तरीय विशेष आरोग्य मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक, भाजपा वैद्यकीय आघाडी प्रदेश संयोजक डॉ बाळासाहेब हरपळे, ऍड विजय काबरा व सर्वांचे आभार मानले.       या नियुक्ती बद्दल डॉ. स्वप्नील मंत्री यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

शिक्षण महर्षी बाबासाहेब भाऊ आकात स्मृती पुरस्कार वाबळेवाडीच्या वारे गुरुजींना जाहीर, ८ मार्च रोजी वितरण

Image
  परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण    येथील लाल बहादुर शास्त्री महाविद्यालयाच्या वतीने दिला जाणारा शिक्षण महर्षी स्व.बाबासाहेब भाऊ आकात स्मृती पुरस्कार यंदा जि.प.आंतरराष्ट्रीय शाळा, वाबळेवाडीचे तत्कालीन मुख्याध्यापक तथा राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक दत्तात्रय वारे गुरुजी यांना जाहीर झाला आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रोख २१ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.               स्व .बाबासाहेब भाऊ आकात                   दत्तात्रय वारे गुरुजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा गावाचा कायापालट करून गावाला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देणारे राष्ट्रपती पुरस्कार विजेते सरपंच भास्करराव पेरे पाटील यांना पहिला पुरस्कार देण्यात आला आहे. दुसऱ्या पुरस्कारासाठी वारे गुरुजींची निवड पुरस्कार निवड समितीने केली आहे.  येत्या ८ मार्च रोजी सकाळी १० वाजता परतूर येथील स्व.बाबासाहेब आकात सभागृह, लाल बह...

प्रा डॉ शाम जवळेकर यांना यंदाचा समाजरत्न पुरस्कार जाहीर

परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण  नाशिक येथे समाजसेवी संस्था जे जे फाऊंडेशनच्या वतीने सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक, क्रीडा आदी कार्यामध्ये विशेष योगदान,कार्य करत असणाऱ्या संस्था,व्यक्तीना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदाच्या सामाजिक कार्यात सदैव तत्परतेने सहभाग असणारी मराठवाडा विभाग जालना जिल्ह्यामधील सेवा भावी संस्था केसरिया बहुउद्देशीय सेवा भावी संस्था परतूर जि जालना व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा डॉ शाम जवळेकर यांच्या कार्याची दखल घेत पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यासह प्रोत्साहन पर पुरस्काराचे स्वरूप रुपये 11000/- शाल,श्रीफळ सन्मानचिन्ह असे असेल. लवकरच संस्थेचा वतीने सन्मान सोहळा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित साजरा केला जाणार असल्याची माहिती घोषणा जे जे फाऊंडेशन नाशिक चे अध्यक्ष श्री जितेंद्र जोशी यांनी केली.  या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.