Posts

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

वाई येथे अखंड हरिनाम सप्ताह संगीत रामायण कथा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तसेच श्री रामदूत बजरंग बली प्राणप्रतिष्ठा व कळशारोहन सोहळा.

Image
प्रतिनिधी रामेश्वर उबाळे  मंठा तालुक्यातील वाई येथे अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मित्ती मा 6 सहा दिनांक 3/2/2025 वार सोमवार हरिभक्त परायण गुरुवर्य भगवान बाबा आनंदगडकर यांच्या आशीर्वादाने दैनंदिन कार्यक्रम*पहाटे 4 ते 6 काकडा, भजन*6*7विष्णुसहस्त्रनाम*7 ते 9 ज्ञानेश्वरी पारायण*9 ते 11 गाथा भजन*1 ते 4 राम कथा*सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ व रात्री 8 ते 10 हरिकीर्तन व नंतर हरी जागर होईल.    शिवचरित्रकार श्री हरिभक्त परायण 1) बाळासाहेब महाराज शिंदे फेमस आळंदी देवाची यांचं सोमवार दिनांक 3/2/ 2025 रोजी पहिले कीर्तन होणार आहे तरी परीसरातील भाविक भक्ताने या कीर्तनाचा आनंद घ्यावा अशी वाईगावातील सर्व नागरिकांची इच्छा आहे. 2) हरिभक्त डॉक्टर अरुण वाळके संतपिट श्री क्षेत्र पैठण यांचे कीर्तन होणार आहेत. 3) हरिभक्त श्री प्राध्यापक उद्धव महाराज राऊतआकनिकर एम ए संगीत यांचे कीर्तन होणार आहेत 4) हरिभक्त म माळोदे आष्टी.  5) हरिभक्त नारायण म पिंपळे गुरुजी.  6) हरिभक्त नंदू जाधव खडका.  7) हरिभक्त सागर म.दिंडे नाशिक  8) हरिभक्त अर्जुन म मोठे महाराज पळशीकर य...

प्रसिद्ध ज्योतिष्य आचार्य सुनील शास्त्री यांचे परतुरात प्रथमच गुरुदरबाराचे आयोजन ,नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा - मोहन अग्रवाल

Image
 परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण   परतुर शहरात प्रथमच प्रसिद्ध ज्योतिष्य आचार्य सुनील शास्त्री यांचे गुरुदरबाराचे आयोजन २ फेब्रुवारी २०२५ रविवार रोजी दुपारी ४ : ०० वाजता गजानन लॉन्स साईबाबा मंदिर जवळ परतुर येथे करण्यात आले आहे.  आचार्य सुनील कुमारजी हे गेली २२ वर्ष भाग्य परिवर्तनाच्या माध्यमातून घरातील प्रत्येक अडचणींवर योग्य आणि फलदायी मार्ग दाखवत असलेल्या संपूर्ण महाराष्ट्रासह अमेरिका कॅलिफोर्निया, दुबई पासून देशात दिल्ली, गुडगाव, हैदराबाद, गोवा, इंदोर, आणि महाराष्ट्रात छत्रपती संभाजी नगर, पुणे, नाशिक व मुंबई येथे त्यांचे सेंटर्स आहेत तरी सर्व नागरिकांनी या कार्यक्रमास परिवारसह उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कार्यक्रमाचे आयोजक मोहन अग्रवाल यांनी कळविले आहे.

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष पदी विजय यादव तर सचिव पदवी अतुल हजारे.

Image
परतूर प्रतीनिधी कैलाश चव्हाण परतुर येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती 2025 ची बैठक शासकीय विश्रामगृह प्रवीण डुकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी सर्वानुमते सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष पदी विजय यादव तर सचिव पदी अतुल हजारे, उपाध्यक्ष शुभम कटोरे, कोषाध्यक्ष संदीप शिंदे, सहकोषाध्यक्ष किशोर ठोंबरे, सहसचिव विठ्ठल सोनपावले, संघटक गोपी ठाकूर, यांची निवड करण्यात आली. तर सल्लागार समिती मध्ये बाबाजी गाडगे, शत्रुघ्न कणसे, विठ्ठलराव बरकुले, सुदर्शन सोळंके, अमोल सुरूग, प्रवीण सातोणकर, संतोष हिवाळे, शामसुंदर चितोडा, सचिन खरात, नामदेव गोरे, प्रवीण डुकरे यांची निवड केली.    याप्रसंगी बैठकीला मुरली सोनखेडकर, ऋषिकेश कराळे, सुनील गायकवाड, श्याम शिंदे, विष्णू मचाले, आदी शिवप्रेमी उपस्थित होते.

मुख्याध्यापक एल. के. बिरादार यांना मातृशोक

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण   दि. 30 - लालबहादूर शास्त्री विद्यालयाचे मुख्याध्यापक एल. के. बिरादार यांच्या मातोश्री मुद्रिकाबाई किशनराव बिरादार यांचे बुधवारी रात्री 11:50 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.  त्या 80 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती,दोन मुले,एक मुलगी,सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर जामखंडी ता. भालकी जि. बिदर या त्यांच्या मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी समाजातील सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ॲड. सुरेश काळे यांना जाहीर झाला महाराष्ट्र गौरव सन्मान पुरस्कार

Image
परतुर प्रतिनिधी- कैलाश चव्हाण    परतुर वकील संघाचे सचिव ॲड.सुरेश काळे यांना सुप्रीम ह्युमन राईट इंटेलिजन्स इंडिया या संस्थेमार्फत महाराष्ट्र गौरव पुरस्कार मराठवाडा विभागातून घोषित झाला आहे.    अहो रात्र दिन, दुबळ्या ,वंचित ,शोषित ,पीडित आदिवासी समूहासाठी पोट तिडकीने व स्वतःला झोकून देऊन काम करणारे असे सर्वसामान्यतून उभा राहिलेले नेतृत्व ॲड.सुरेश काळे यांना नुकताच महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. या अनुषंगाने परतुर मंठा विधानसभेचे लाडके आमदार मा.बबनरावजी लोणीकर साहेब यांनी त्यांचा भ्रमणध्वनी द्वारे अभिनंदन केले तसेच विविध क्षेत्रातील लोकांनी व मित्रमंडळींनी त्यांना या पुरस्काराबद्दल खूप खूप शुभेच्छा दिल्या सर्वच स्तरातून या पुरस्काराची चर्चा केली जात आहे. येणाऱ्या 02 मार्च 2025 रोजी नाशिक येथे या पुरस्कार वितरणाचे कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे.

खा.डॉ.कल्याण काळे यांनी मनोज जरांगे पाटील यांची अंतरावली सराटी येथे भेट घेतली.

Image
जालना प्रतीनीधी नरेश अन्ना मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले मा.मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अंतरवाली सराटी गावात जाऊन खा.काळे यांनी यावेळी उपस्थित आंदोलक व गावकऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. राज्य सरकार या प्रकरणात गंभीर्याने लक्ष्य घालवे व मार्ग काढावा. जरांगे पाटील सोबत बसलेले आंदोलक यांची तब्येत पण   खालवत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी यांनाही या ठिकाणी डॉक्टर ची टीम वाढवावी व ताबडतोब काळजी घ्या अशा सूचना खा.कल्याण काळे यांनी केल्या

जालना शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवून बाळासाहेबांना जयंतीनिमित्त अभिवादन !

Image
जालना, (प्रतिनिधी) नरेश अन्ना  दि. 23 हिंदूहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्या हस्ते शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून शहरातील गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, वादविवाद स्पर्धा आदींचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर उपजिल्हाप्रमुख बाबुराव पवार, माजी सभापती देवनाथ जाधव, शहर प्रमुख बाला परदेशी, घनश्याम खाकीवाले, दुर्गेश काठोटीवाले, माजी नगरसेवक जे.के. चव्हाण, गंगुताई वानखेडे, विजय पवार, मंजुषा घायाळ यांची उपस्थिती होती. विविध ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष संघटनेत ८० टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण हा मूलमंत्र घालून दिला. त्याप्रमाणे मुंबईसह राज्यात शिवसेनेच्या माध्यमातून रक्तदान शिबिर, रुग्णवाहिका, गोरगरिबांना मदत, कोणतत्याही अडी-अडचणीच्या व संक...